Nysa Devgan : न्यासाचा पार्टीतला लूक वेगळाच! नेटकरी म्हणाले-प्लास्टिक सर्जरीची ताकद | पुढारी

Nysa Devgan : न्यासाचा पार्टीतला लूक वेगळाच! नेटकरी म्हणाले-प्लास्टिक सर्जरीची ताकद

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Nysa Devgan) आणि काजोलची मुलगी न्यासाने रात्री उशिरा एका पार्टीसाठी उपस्थिती लावली होती. या पार्टीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडिओमध्ये न्यासा आणि तिचे मित्र वेगवेगळ्या गाण्यांवर नाचताना आणि पार्टीचा एन्जॉय करताना दिसतात. ओरहानने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला असून ‘the only attitude is gratitude’ अशी कॅप्शन दिली आहे. या पोस्टनंतर लगेचच प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही नेटिझन्सनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या पार्टीतील तिचा लूक पाहून काहींनी तिला ‘प्लास्टिक सर्जरीची शक्ती’, ‘मेकअप आणि सर्जरीचा परिणाम’ अशी कमेंट्स दिल्या. तसेच ‘शस्त्रक्रियेनंतर ‘संपूर्ण व्हॅम्पायर दिसत आहेस’ अशी टिप्पणी दिली. (Nysa Devgan)

पण लक्ष वेधून घेतले ते ओरहानची तथाकथित गर्लफ्रेंड जान्हवी कपूर हिची. अभिनेत्री जान्हवी कपूरने लिहिले, ‘मिस यू बेबी’. याशिवाय भूमी पेडणेकर आणि खुशी कपूर यांनीही पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिलीय.

ओरहानने अर्जुन रामपालची मुलगी माहिका आणि अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसहित अन्य फ्रेंड्ससोबत फोटो शेअर केले आहेत. सर्वजण पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. पोस्टमध्ये एक खास फोटो आहे, यामध्ये न्यासा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये पोझ देताना दिसत आहे.

Orhan Awatramani, Nysa यांचं बॉन्डिंग चांगलं आहे. त्यांना नेहमी एकत्र फोटोंमध्ये पाहिलं जातं. जुलैमध्ये दोघे सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी युरोपल गेले होते. त्यांच्यासोबत एक कॉमन फ्रेंड वेदांत महाजनदेखील होते. त्यानंतर पुढे ॲमस्टरडॅममध्ये जान्हवी कपूर-वरुण धवन यांनी त्यांना जॉईन किया. हे सर्वजण याठिकाणी शूटिंगमध्ये बिझी होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

Back to top button