रश्मिकासोबत काम करायचं नाही | पुढारी

रश्मिकासोबत काम करायचं नाही

साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत काम करण्यास कांतारा फेम ऋषभ शेट्टी नकार का देतो, हा प्रश्न अनेकदा पडतो. बॉलीवूड आणि साऊथमध्ये रश्मिका मंदानाची हवा असली तरीही त्याला तिच्यासोबत काम करायचं नाही. याचा उलगडा नुकताच झाला. यासंबंधीच्या व्हायरल व्हिडीओत रश्मिका, मी या क्षेत्रात अपघातानेच आल्याचे सांगतेय. रश्मिकाने ऋषभच्या खास मित्राचं, रक्षित शेट्टीच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव न घेता कन्नड सिनेमांबाबत चुकीचं मत व्यक्त केले. रश्मिकाला नेटकर्‍यांनी ट्रोल केले.

ज्या प्रॉडक्शन हाऊसबाबत रश्मिकाने चुकीची प्रतिक्रिया दिली, त्याच परमवाह या रक्षित शेट्टीच्या प्रॉडक्शनने रश्मिकाला अभिनयात पहिली संधी दिली होती, हे विशेष. रश्मिका मंदाना सध्या विजय देवरकोंडासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजून तरी त्यांनी त्यांच्या नात्याविषयी खुलेआम काही सांगितलेलं नाही. रश्मिकाने साकारलेल्या श्रीवल्ली या भूमिकेला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

Back to top button