चर्चा कार्तिकच्या डेटिंगची | पुढारी

चर्चा कार्तिकच्या डेटिंगची

बॉलीवडूच्या विश्वात आपले पाय रोवून मजबूतपणे उभे राहण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने खूप खस्ता खाल्ल्या. ‘भूल भुलैया 2’च्या यशानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असणारा कार्तिक खासगी आयुष्यामुळेही तुफान चर्चेत असतो. त्याच्या डेटिंगबद्दल खूप चर्वितचर्वण होतं. आता चक्क अभिनेता हृतिक रोशनच्या बहिणीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. असंख्य मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या कार्तिकच्या मनात मात्र हृतिकची बहीण पश्मीना रोशन राज्य करतेय; पण आता खुद्द कार्तिकने त्यांच्या खासगी आयुष्यावर खुलासा करताना म्हटलंय की, ‘मी आता एक सेलिब्रिटी आहे. माझी कोणतीही गोष्ट कायम चर्चेत असते. कुणासोबत मैत्री नसली तरी, त्या नात्याला रिलेशनशिपचं लेबल लावलं जातं. जेव्हा माझ्याबद्दल सोशल मीडियावर वाईट गोष्टी रंगत असतात, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं; पण मी आता माझी समज घालतोय सेलिब्रिटीचं खासगी आयुष्य आयुष्य खासगी ठेवणं प्रचंड कठीण असतं. ’

Back to top button