भूमीचा ग्लॅमरस तडका | पुढारी

भूमीचा ग्लॅमरस तडका

भूमी पेडणेकर ही गुणी अभिनेत्री आहे. अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे असे विशेष स्थान निर्माण केलंय. 2015 साली आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. अन् पाठोपाठ तिचे बहुतेक चित्रपट यशस्वी ठरले. भूमी अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांची वाहवा मिळवते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर अतिशय ग्लॅमरस दिसतेय. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर ब्लॅक आऊटफिटमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे.

भूमी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सतीश पेडणेकर यांची मुलगी. तिचा जन्म 18 जुलै 1989 रोजीचा. बॉलीवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख. वडिलांचे कर्करोगामुळे निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून संघर्ष करत तिने हा टप्पा गाठला आहे. ती सध्या तिच्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो 16 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होतोय.

Back to top button