राजा राणीची गं जोडी : मोनाऐवजी 'फँड्री' फेम 'ही' अभिनेत्री झळकणार - पुढारी

राजा राणीची गं जोडी : मोनाऐवजी 'फँड्री' फेम 'ही' अभिनेत्री झळकणार

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील राजा राणीची गं जोडी ही मालिका लोकप्रिय ठरत आहे. अल्पावधीत या मालिकेने आपला प्रभाव प्रेक्षकांवर टाकला. आता या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. राजा राणीची गं जोडी मालिकेत मोनाची भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली होती. पण, ती सध्या मन झालं बाजिंद या मालिकेत दिसतेय. त्यामुळे श्वेता खरातने ही मालिका सोडली. आता तिच्या जागी नवी अभिनेत्री कोण येणार, याची चर्चा होतेय.

या मालिकेत वेगळं वळण लागलं आहे. या मालिकेत मोना (श्वेता खरात) च्या जागी नवी मराठी अभिनेत्री दिसणार आहे.

गेल्या काही भागांमध्ये मोना मालिकेत दिसली नाही. कारण तिने ही मालिका सोडलीय. झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसते. त्यामुळे आता नवी मोना कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या नव्या अभिनेत्रीची होणार एन्ट्री

मोन म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे या मालिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याने नागराज मंजुळेच्या शॉर्टफिल्ममध्ये काम केलंय. तहकूब या शॉर्टफिल्ममध्येही ती दिसली होती. तिने फॅंड्री, बबन यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

ऐश्वर्या अभिनेत्री आणि डान्सरही आहे. तिने पुणे येथील ललित कला केंद्रात अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

तर श्वेता खरातने साताऱ्यात असताना ऑडिशन्स दिले होते. ऑडिशनमधून राजा राणीची गं जोडी मालिकेसाठी तिची निवड झाली होती. श्वेता खरातही मूळ साताऱ्याची आहे.

Back to top button