जेनेलिया मराठमोळ्या लुकमध्ये दिसली ; हातात हिरवा चुडा अन् केसात मोगऱ्याचा गजरा

मुंबई; पुढारी ऑनलाईन: रूपेरी पडद्यापासून दुर असली तरी नेहमीच चर्चेत असणारी क्यूट अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री म्हणजे जेनेलिया देशमुख सध्या तिच्या मराठमोळ्या लुकमुळे चर्चेत आली आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वसामन्यांपासनू ते सेलेब्स आपापल्या घरातील बप्पाचे दर्शन आणि पारंपरिक पोशाख परिधान करून नवनवे फोटोशूट करत आहेत. दरम्यान, जेनेलिया देशमुखचादेखील सहभाग पाहायला मिळत आहे.

जेनेलियाचा हटके लूक इन्स्टावर

नुकतचं जेनेलियाने लाल रंगाच्या साडीमधील पारंपारिक मराठमोळा लुक आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला. तिचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारणही तसेच आहे. जेनेलिया या ट्रेडिशनल लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

जेनेलिया

जेनेलियाने लाल रंगाची साडी परिधान केली असून विशेष म्हणजे त्यासोबत तिने केसात गजरा, हातात हिरवा चुडा आणि कानात झुमकेही घातले आहेत.

May be an image of 1 person and jewellery

जेनेलियाने या लुकमधील फोटो शेअर करत प्रत्येक फोटोला वेगवेगळी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

genelia

एका शेवटच्या फोटोला कॅप्शन देत जिनिलियाने ” साडी तुम्हाला कस फिट राहायच कधीच सांगत नाही. मात्र, ती तुम्हाला सर्वात वेगळं बनवत असते आणि हेच सत्य आहे.” असे म्हटले आहे.

genelia

चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे.

आपल्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहत असते. जेनीलियाला तिच्या सौंदर्यासाठीही ओळखलं जातं. दोन मुलांची आई जेनीलिया अतिशय फिट आहे.

गमंतीशीर व्हिडिओ नेहमी ती आपल्या सोशल अकाऊंट्सवर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफॉलोयिंग आहे.

काही दिवसांपूर्वी, रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुलांवर कौतुकाचा वर्षाव सुरू होता.

रितेशचे दोन्ही मुलं रियान आणि राहिल दोघेही खूप गोड बाप्पांची आरती म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार लावल्यामुळे रितेश आणि जेनेलियावर कौतुकाचा वर्षाव होत होता.

हेही वाचलं का?

 

Back to top button