आई कुठे काय करते : अरुंधतीला मिळणार पहिला पगार, तर संजनाची नोकरी जाणार! - पुढारी

आई कुठे काय करते : अरुंधतीला मिळणार पहिला पगार, तर संजनाची नोकरी जाणार!

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आई कुठे काय करते या स्टार प्रवाह मराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रोज एक नविन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ही मालिका सध्या भरपूर मनोरंजन करत आहे. यात आता संजनाच्या लहान मुलाला अर्थात निखिलला अनेक प्रश्न पडलेले आहेत. त्याची उत्तरे शोधताना संजना आणि इतरांची दमछाक होताना दिसत आहे. तर या मालिकेत अरुंधतीला नोकरी मिळणार व दुसरीकडे संजनाच्या नोकरीवर गदा येणार आहे.

आई कुठे काय करते ही मालिक सध्या रंजक वळणावर आहे. संजनाने अनिरूद्धसोबत लग्नगाठ बांधली तरी ती अजुनही देशमुख घराण्याची होऊ शकलेली नाही. यातच या मालिकेने सध्या अतिशय रंजक वळण घेतले आहे. देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्याच्या नादात ती आपल्या नोकरीकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता तिला देखील बेरोजगारीचा फटका बसणार आहे.

मालिकेमध्ये अरूंधतीला मात्र एक चांगली संधी मिळाली आहे. तिला यशच्या एका मित्राच्या शॉर्ट फिल्मसाठी गाणं गाण्याची संधी मिळणार आहे. या गाण्यामुळे अरुंधतीला पहिला पगार देखील मिळणार आहे. या गाण्यातून मिळालेले मानधन अर्थात पहिला पगार अरुंधती अप्पा आणि आईच्या हातात देणार आहे. गाण्याच्या संधी व्यतिरिक्त अरुंधतीला एक नवी नोकरी देखील मिळाली आहे.

यातच अरुंधतीचा पहिला पगाराच्या सेलिब्रेशनचा माहोल असतानाच संजनाची नोकरी गेल्याचे चित्र पहायला मिळणार आहे. अरुंधतीचा आनंदाची घरात पार्टीची चर्चा सुरु असतानाच संजना कामावरून घरी येते. ती घरी आल्यानंतर अनिरुद्ध तिला म्हणतो आम्ही आता पार्टीबद्धलच बोलत होतो. तुझं प्रेझेन्टेशन छान झालं असणार आणि तूला प्रमोशन मिळालं असणार असे म्हणतो. तेव्हा संजना नाराज होवून आपला चेहरा पाडून आपली नोकरी धोक्यात असल्याचे अनिरुद्ध सांगते. यानंतर अनिरूध्दला धक्काच बसतो. माझ्या लॅपटॉपमधून प्रेझेन्टेशन डिलीट झाल्याने मेहताने मला दोन महिने घरी बसण्यास सांगितले आहे.

संजना आणि शेखर यांचा मुलगा निखिल आईला भेटायला देशमुखांच्या घरात आला आहे. घरात गोकुळाष्टमी निमित्ताने कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूजा सुरू असते. या पुजेला पूजेला संजना आणि अनिरुद्ध बसले होते. यावेळी निखिलच्या मनात प्रश्न निर्मान होतो की, अनिरुद्ध काकांबरोबर आपली आई का पूजेला बसलीय? तो हा प्रश्न सर्वाना विचारत अरुंधतीला अनिरुद्धसोबत पुजेस बसण्यास सांगतो.

Back to top button