रश्मिका मंदाना : मी कठोर परिश्रम घेत राहीन | पुढारी

रश्मिका मंदाना : मी कठोर परिश्रम घेत राहीन

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच चर्चेत असते. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूडमध्येही नाव कमावले आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. नुकतीच रश्मिकाने ट्रोलिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

ती म्हणते, ‘गेल्या काही वर्षांपासून काही गोष्टींमुळे मला त्रास होत आहे. मला वाटते की, मी यावर लक्ष देण्याची वेळ आली आहे. मी केवळ माझ्यासाठी बोलत आहे. हे मी काही वर्षांपूर्वी करायला पाहिजे होते. मी करिअरला सुरुवात केल्यापासून मला खूप द्वेषाचा सामना करावा लागला आहे. जेव्हा सोशल मीडियावर माझी थट्टा केली जाते आणि विशेषतः मीनके लेल्या गोष्टींसाठी माझी थट्टा के ली जाते,हे निराश करणारे असते. मी आतापर्यंत ज्या लोकांसोबत काम केले आहे, त्यांचे मी नेहमीच कौतुक केले आहे. मी कठोर परिश्रम करतराहीन आणि तुम्हाला आनंदी करत राहीन, असे रश्मिकाने म्हटले आहे.

Back to top button