मुंबई; पुढारी ऑनलाईन : वरुण धवन हा असा बॉलिवूड अभिनेता आहे ज्याने अल्पावधीतच लोकांच्या हृदयात आणि इंडस्ट्रीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट्टही दिसली होती. 2012 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 10 वर्षे झाली असून या 10 वर्षात वरुण धवनने अनेक धमाकेदार चित्रपट देत लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. तुम्हीही या अभिनेत्याचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. वरुण धवन सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. अलीकडेच, वरुणने याबद्दल खुलासा केला. आता त्याने त्याच्या तब्बेतीबद्दल अपडेट दिले आहे आणि स्वत:ला बरे ठेवण्यासाठी तो कोणत्या गोष्टींचा अवलंब करत आहे हे सुद्धा त्याने सांगितले आहे. (Varun Dhawan Health)
वरुण धवन वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. एका कार्यक्रमादरम्यान, वरुण धवनने स्वत: सांगितले होते की त्याचा अलीकडील चित्रपट 'जुग-जुग जिओ' च्या खराब कामगिरीच्या तणावानंतर, त्याला समजले की तो वेस्टिबुलर हायपोफंक्शन नावाच्या समस्येने ग्रस्त आहे. वरुनने पुढे म्हटले होते की आरोग्याला प्राधान्य देत आहे, म्हणून त्याने काम थांबवून आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जेव्हा वरुणने लोकांना याबद्दल सांगितले तेव्हा चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. तो यातून लवकरच बाहेर येईल, असे त्याचे चाहते सोशल मीडियावर सतत सांगत आहेत. आता त्यानेही चाहत्यांना त्याच्या तब्येतीचे अपडेट दिले आहे.
या वरुण धवनने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, तो बरा झाल्यानंतर परत येण्यासाठी खूप उत्सुक आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो योगा, पोहणे, फिजिओ आणि दैनंदिन जीवनशैलीत बदल करत आहे, ज्यामुळे त्याला खूप दिलासाही मिळत आहे. त्याला या प्रसंगी आधार देणाऱ्या आणि त्याच्यासाठी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे त्याने या पोस्टद्वारे आभारही मानले आहेत. (Varun Dhawan Health)
वरुण धवन याचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भेडिया' हा रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेननही दिसणार आहे. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
अधिक वाचा :