चर्चा करूनच कंगनाला भाजपचे तिकीट : नड्डा | पुढारी

चर्चा करूनच कंगनाला भाजपचे तिकीट : नड्डा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री कंगना राणावत हिने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातून भाजपच्या तिकिटावर लढण्याची इच्छा कंगनाने व्यक्त केली आहे.

भाजपमध्ये कंगनाचे स्वागत आहे; पण निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय चर्चा करूनच घेतला जाईल, असे नड्डा म्हणाले. जनतेला हवे असल्यास आणि भाजपने तिकीट दिल्यास हिमाचल प्रदेशातील मंडीमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे कंगनाने म्हटले होते. कंगना यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी की नाही, हा माझ्या एकट्याचा निर्णय असू शकत नाही. त्यासाठी पक्षाच्या तळागाळातील स्तरापासून संसदीय समिती, निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे, असे नड्डा म्हणाले आहेत.

Back to top button