Samantha Prabhu: सामंथा प्रभूला ‘या’ दुर्मिळ आजाराची लागण; हाताला सलाईन लावलेला फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी यशोदा या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. या ट्रेलरनंतर या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे कौतुक होत आहे. सध्या तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तिचे चाहते आता काळजीत पडले आहेत. तिला एका दुर्मिळ आजाराची लागण झाली असल्याचे तिने सांगितले आहे. ज्यामुळे ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. (Samantha Prabhu)
नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोमध्ये समंथाच्या हाताला सलाईन लावलेली दिसून आली. हा फोटो शेअर करत तिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या यशोदा ट्रेलरला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. समांथाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, यशोदाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. मी तुमच्यासोबत शेअर केलेले हे प्रेम आणि कनेक्शन मला जीवनातील माझ्या संकटाना तोंड देण्याचे बळ देते. (Samantha Prabhu)
आजाराशी माझा संघर्ष सुरु
यासोबतच तिने असा खुलासा देखील केला आहे की, ती एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. तिने याबाबत माहिती देत असताना लिहिले आहे की, काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार आजाराचे निदान झाले. मला वाटले की मी बरे झाल्यावर हे सर्वांसोबत शेअर करेन; पण या क्षणी मला पूर्वीपेक्षा थोडा जास्त त्रास होत आहे. या आजाराशी सध्या माझा संघर्ष सुरु आहे. मी लवकरच पूर्णपणे बरी होईन, असा डॉक्टरांनी विश्वास दाखवला असल्याचे देखील तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
समंथाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट
हेही वाचा