आलिया भट्ट या अभिनेत्रीचा डार्लिंग्ज चित्रपट पूर्ण - पुढारी

आलिया भट्ट या अभिनेत्रीचा डार्लिंग्ज चित्रपट पूर्ण

दिग्दर्शक जसमीत के. रीन यांच्या ‘डार्लिंग्ज’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शाहरूख खानच्या ‘रेड चिलीज’ एन्टरटेन्मेंट आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या सनशाईन प्रोडक्शनतर्फे हा चित्रपट बनवला जात आहे. आलिया भट्ट हिच्यासह विजय वर्मा हेदेखील दिसणार आहेत.

चित्रपटाचे चित्रीकरण काल रात्री पूर्ण झाले असून कलाकारांनी आणि क्रू सदस्यांनी केक कापून चित्रपटाचे पूर्ण होणे, साजरे केले. आलिया भट्ट, विजय वर्मा आणि दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी रॅप-अपच्या काही सुंदर फोटोज आणि व्हिडीओजसोबत कास्ट आणि क्रू ने ही बतम आपल्या सोशल मीडियावर शेयर केली आहे.

चित्रपटात शेफाली शाह आणि रोशन मैथ्यू देखील आहेत, ज्यांनी मागील महिन्यात आपले चित्रीकरण पूर्ण केले आहे.

‘डार्लिंग्स’मध्ये एक क्वर्की आई-मुलीच्या जोडीची अनोखी कहाणी आहे, ज्या जगात आपले स्थान शोधण्याच्या प्रयत्नात विचित्र परिस्थितीमधून जातात. ही डार्क कॉमेडी मुंबईमधील एका रूढ़िवादी निम्न मध्यमवर्गीय पार्श्वभूमीवर स्थापित असून दोन महिलांच्या जीवनाचा शोध घेते, ज्या असाधारण परिस्थितीत साहस आणि प्रेम मिळवतात.

परवेज शेख आणि जसमीतद्वारे लिखित, डार्लिंग्स गौरी खान, आलिया भट्ट आणि गौरव वर्मा यांच्याद्वारे निर्मित असून रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इटरनल सनशाइनची प्रस्तुति आहे.

त्यानिमित्त सर्व कलाकारांसह क्रूने केक कापून जल्लोष केला. सोशल मीडियातून याचे फोटोज शेअर करण्यात आले आहेत. एका विचित्र आई आणि मुलीची ही कहाणी आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय पार्श्‍वभूमीवर घडणारा हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी असणार आहे.

 

Back to top button