गणेशोत्सव : रोहित राऊत याचं लाँच झालं नवं गाणं, ‘गजर तुझा मोरया’ | पुढारी

गणेशोत्सव : रोहित राऊत याचं लाँच झालं नवं गाणं, ‘गजर तुझा मोरया’

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आपली यारी गाण्याच्या यशानंतर आता नादखुळा म्युझिक लेबल नवं गाणं घेऊन आले आहेत. निखिल नमीत आणि प्रशांत नाकती यांची निर्मिती आहे. सचिन कांबळे दिग्दर्शित गजर तुझा मोरया हे गाणं लाँच झाले आहे. गजर तुझा मोरया हे गीत लिहून त्याचे संगीत दिग्दर्शन केलं आहे, कुणाल करणने तर रोहित राऊतने हे गाणे गायले आहे.

सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

गणेशोत्सव : कोकणच्या ‘महाउत्सवास’ आजपासून प्रारंभ!

निर्माते प्रशांत नाकती म्हणतात, संगीत दिग्दर्शक कुणाल-करण जोडीसोबत रोहित राऊतची भट्टी खूप चांगली जमते. या गाण्यातही तुम्हाला याचीच अनुभूती येईल.

गणेश प्रतिष्ठापना मुहूर्त दुपारी दोनपर्यंतचा, जाणून घ्या प्रतिष्ठापना कशी करावी

मराठवाडा विद्यापीठ जनसंपर्क अधिकाऱ्याचे विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग

यंदा महाराष्ट्राने कोरोनासह महापुराच्याही नैसर्गिक संकटाला तोंड दिले आहे. सर्व संकटातून वाट काढताना विघ्नहर्त्याचा धावा करणा-या प्रत्येक भक्ताची भावना ह्या गाण्यातून प्रतीत होत आहे.

England vs India Test : भारत इतिहासाच्या उंबरठ्यावर..!

आईन्स्टाईन, हॉकिंगपेक्षाही तीक्ष्ण बुद्धीची ८ वर्षांची मुलगी!

दिग्दर्शक सचिन कांबळे म्हणतात, ‘महापुरातल्या अनेक कुटूंबांची प्रातिनिधिक कथा गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे घराघरात गणेश आराधनेत ऐकलं जाईल, अशी आशा आहे.’

कुणाल-करण यांनी आजवर अनेक टीव्ही मालिका, एड-फिगल्म्सना संगीत साज चढवला आहे. कुणाल-करण म्हणतात- ‘आमचं घर कोकणात असल्याने यंदा कोकणासह महाराष्ट्राला पावसाने जे झोडपलंय. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे या गाण्याचे बोल आणि स्वरसाज हृदयातून उमटलेला आहे. रोहितने गायलेले हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, असं मला वाटतं.’

रोहित राऊत म्हणतो, ‘कुणाल-करणच्या संगीतामध्ये एक जादू आहे. हे गाणे तुम्हाला भक्तीरसात लीन करेल. याची मला खात्री आहे. नादखुळा म्युझिकसोबत माझं हे पहिलं गाणं आहे. या अगोदरची नादखुळा म्युझिकची दोन्ही गाणी कानसेनांच्या पसंतीस पडली आहेत. त्यामुळे हे ही गाणे सर्वांना आवडेल, अशी मला आशा आहे.’

जगातील ४० टक्के शार्क आणि रे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर

सर्वात शक्तिशाली दुर्बीण डिसेंबरमध्ये होणार लाँच 

पाहा व्हिडिओ-Gajar Tujha Morya – Official Song | Rohit Raut | Sachin Kamble | Kunal – Karan | Ganapati Song 2021 

Back to top button