Sunny Leone : सनी लिओनीच्या प्रत्येक फोटोंवर मराठीत काॅमेंट्स करणारा 'तो' कोण? | पुढारी

Sunny Leone : सनी लिओनीच्या प्रत्येक फोटोंवर मराठीत काॅमेंट्स करणारा 'तो' कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री असणारी आणि करोडो भारतीय तरुणांची प्रथम पसंती ठरलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी . तिचं नाव जरी घेतलं तरी, चांगल्या चांगल्या लोकांच्या डोळ्यांसमोर तिच्या सेक्सी अदा आणि हाॅट फोटो, आयटम साॅंग्ज येतात.

सनी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिचे सेक्सी फोटो पाहून चाहते पुरते घायाळ होऊन जातात. सनीच्या फोटोंवर हजारो-लाखो लाईक्स आणि काॅमेंट्स येत राहतात. हिंदी आणि इंग्रजीत भाषेतील काॅमेंट्स असतातच. पण, तिच्या प्रत्येक दिलखेचक फोटोंवर मराठीत काॅमेट्स करणारा एक बहाद्दर आम्हाला सापडला.

खरंतर सनी बाॅलिवुडमध्ये येण्यापूर्वी एक प्रसिद्ध पाॅर्नस्टार होती. पण, पुन्हा भारतात येऊन चित्रपटविश्वास स्वतःच्या अभिनयाने आणि डान्सने वेगळी प्रतिमा निर्माण करणारी अभिनेत्री ठरलीय. तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती खूपच सक्सेस झालेली आहे. सनी, तिचा नवरा आणि तिच्या मुलांचा फोटो नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

तिच्या या फोटोंवर तिला इंग्रजी आणि हिंदी भाषेतील असंख्य काॅमेंट्स येतात. पण, तिला मराठी कितपत समजतं माहीत नाही. पण, तिच्या प्रत्येक फोटोंवर मराठी काॅमेंट्स करणारा नगरच्या पाथर्डी तालुक्यातील देवा आव्हाड या मित्रांशी आम्ही संवाद साधला.

सनी लिओनी

देवा म्हणतो की, “आपण सनी लिओनीचे प्रोफाईल पाहिलं, तर तिने असंख्य फोटो दिसतील. तिच्या या फोटोंवर समिश्र काॅमेंट्स दिसतात. त्यामध्ये बरेच जण शिव्या देतात. काही जण अश्लील भाषेत काॅमेंट्स देतात.

पण, सनी लिओनी ‘न्युट्रल’ वाटते. तिच्या फोटोंवर कोणताही सामान्य माणूस काॅमेंट्स करू शकेल, अशाच काॅमेंट्स मी सनीच्या फोटोंवर करत आलो आहे”, असंही देवा सनी लिओनीबद्दल सांगतो.

“खरंतर सनी लिओनीला पाॅर्नस्टार म्हणूनही जग ओळखत होतं. पण, तिने बाॅलिवुडमध्ये येऊन स्वतःला सिद्धही केलं आहे. पण, तिच्याबद्दल अनेक पूर्वग्रह लोकांच्या मनात आजही आहेत. म्हणून तिच्या फोटोंना अश्लील काॅमेंट्स पडतात. मला वाटतं, तिच्याबद्दल लोकांच्या मनात आजही पूर्वग्रहदूषीतपणा आहे. हे खरंतर चुकीचं आहे. पण, तिने सध्या जे स्वतःला सिद्ध केलं आहे, हे फार महत्वाचं आहे”, असंही देवा सनी लिओनीबद्दल सांगतो.

फोटोंना कमेंट बघितल्या तर बरेच जण शिव्या कमेंट करतात, याचा खरतर राग येतो. मला कोणी विचारलं सनी लिओनी बद्दल काय वाटत. तर मी तिथं न्युट्रल आहे. साधारण माणूस कसा कमेंट करु शकेल. यामुळे मी सरळ सरळ कमेंट केल्या आहेत. त्यातून अपमान वाटू नये. अशा कमेंट करतो. अनेकजण तिच्या फोटोला नको तशा अश्लिल कमेंट करत असतो. हे चुकीच वाटत. तिच्या विषयी पूर्वगृह ठेवून अनेकजण कमेंट करतात. पण हे चूकीच आहे. ती आता काय आहे. हे महत्वाच आहे. असही त्यांनी सांगितल.

सनी लिओनी

सामान्यांबद्दल तिच्या मनात आदर

देवा आव्हाड पुढे म्हणतो की, “तिचे फोटो पाहिले तर लक्षात येते… सनी लिओनी ही माणुसकीसाठी चांगली आहे. तिचे सेटवरीलही फोटो तिच्या प्रोफाईलवर दिसतात. ती अगदी सामान्य स्पाॅटबाॅयसोबतही फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यातून ती एकीकडे सेक्सक अभिनेत्री असनूही सामान्यांबद्दल तिच्या मनात एक आदर आणि कळवळा आहे. त्यामुळे मला सनी माणुसकीप्रिय वाटते.”

“सनी लिओनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या राज्यातील लातूर जिल्ह्यातील एका गरीब मुलीला दत्तक घेतलं. त्या मुलीची ती आई झाली. तिचं पालकत्व सनीनं स्वीकारलं, आता मला सांगा ही तिची माणुसकी आणि माणसाप्रती संवेदनशीलता नाही का? तरीही लोक तिचे फोटो पाहून अश्लील काॅमेंट्स करतात. पण, मी तिची माणुसकी पाहून तिच्या फोटोंवर काॅमेंट्स करत असतो. यामध्ये कधी-कधी कवितांमधूनही काॅमेंट्स लिहीत असतो”, असंही देवा आव्हाड आवर्जुन सांगतो.

 

देवा आव्हाड हा मूळचा अहमदनगरचा

देवा आव्हाड हा मूळचा अहमदनगरचा. तो व्यवसायाने व्हिडिओ एडिटर आहे. सध्या ते पुण्यात काम करतो. त्याला चित्रपटांची आवड आहे. तर सनी लिओनीच्या या निस्सम चाहत्याला आणि त्याच्या विचारांना वेगळ्या दृष्टीनं समजून घेतलं की, सनी लिओनीसारख्या अभिनेत्रींची माणुसकीही आपल्या दिसू लागले. ती दिसावी इतकीच देवा आव्हाडची इच्छा आहे.

हेही वाचलत का :

इतक्या प्रकारचे शाईचे दौत कधी पाहिलेत का?

Back to top button