BBM-4 : "दे धडक - बेधडक", स्पर्धकांचा उडाला गोंधळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी सिझन चौथे पहिले साप्ताहिक कार्य “दे धडक – बेधडक”ची काल सुरुवात झाली. टास्कमध्ये सगळ्याचं सदस्यांचा गोंधळ उडाला. Team A विरुध्द्व Team B असा टास्क रंगणार असून अपूर्वा आणि प्रसाद साप्ताहिक कार्याचे संचालक असणार आहेत. साप्ताहिक कार्याच्या पहिल्या उपकार्यामध्ये सदस्यांमध्ये सुरुवात होताच गोंधळ उडाला. बिग बॉस यांच्या आदेशानंतर देखील सदस्यांमधील ओढाताण थांबेना. आता कार्यात कोणती टीम विजयी होणार आणि कोणत्या सदस्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

टास्कबद्दल टीम A आणि टीम B मध्ये आज चांगलीच चर्चा रंगताना दिसणार आहे. अपूर्वाचे म्हणणे आहे, “मी सांगितल्याप्रमाणे फेअर संचालक असणार आहे, ते चांगले खेळले तर तसं म्हणेन” ज्यावर अक्षय असहमती दर्शवणार आहे.” अपूर्वा त्यावर म्हणाली, ते मी ठरवणार आणि पुढच्या फेरीसाठी अक्षय, मेघा आणि योगेश खेळणार. तर, दुसऱ्या टीमची देखील चर्चा सुरु आहे, प्रसादाचे म्हणणे आहे, सगळे सगळं बघत आहे, आपण खूप फेअर आहोत.”

आज कळेलचं कोण किती फेअर आहे आणि कोण कसं खेळत आहे.

Exit mobile version