Kajol : 'या' कारणासाठी काजोल भडकली जया बच्चन यांच्यावर (video) | पुढारी

Kajol : 'या' कारणासाठी काजोल भडकली जया बच्चन यांच्यावर (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : शारदीय नवरात्री उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडत आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यत अनेक ठिकाणी भाविक दुर्गा मातेचे दर्शन घेत आहेत. याच दरम्यान दरवर्षीप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाने मुंबईतील जुहू परिसरात दुर्गा पूजेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी दुर्गामातेच्या दर्शनासाठी आलेल्या जया बच्चन यांना मात्र, काजोल ( Kajol ) जोरात भडकली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मुंबईतील जुहू परिसरातील दुर्गा मातेच्या दर्शनासाठी काजोलसह बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, राणी मुखर्जी, मौनी रॉय आणि जया बच्चन हे स्टार्स पोहोचले आहेत. यावेळी काजोलनं राणी मुखर्जी आणि जया बच्चन यांच्यासोबत कॅमेऱ्यासमोर पोझ दिली. याच दरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चक्क काजोल ( Kajol ) जया बच्चन यांच्याकडे बोट दाखवत त्याच्यावर भडकली आहे. तर यावेळी काजोलच्या पीच पिंक रंगाची साडीसोबत सिव्हलेस ब्लाऊज आणि मेकअपने चारचॉंद लावले आहेत.

या कार्यक्रमावेळी जया बच्चन बंगाली पद्धतीच्या लाल-व्हाईट रंगाच्या साडीत एकदम रॉयल दिसत होत्या. यावेळी काजोलला जया बच्चन यांच्या सोबत फोटो काढायचे होते. यामुळे तिने जया यांना पापराझीच्या कॅमेऱ्यासमोर येण्याचा आग्रह घरला. मात्र, यावेळी जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. यामुळे काजोलने त्यांना मास्क काढण्यास सांगितले. यावेळी जया बच्चन म्हणाल्या की, ‘जरा धीर धरा’. यानंतर काजोलने त्याचे काहीही ऐकले नाही. शेवटी जया यांना चेहऱ्यावरील मास्क काढून फोटोला पोझ द्यावी लागली. या घटनेवेळी काजोलने जया यांना बोट दाखवत भडकल्याचे दिसतेय. काजोल आणि जया यांचे खूपच चांगले बॉन्डिंग असल्याचे व्हिडिओतून दिसून येतय. या व्हिडिओला कॅप्शन देताना काजोलने ‘मास्क काढावाच लागेल’ असे म्हटलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकांचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला जवळपास १ लाख १५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काजोल कोणत्याही बिग प्रोजेक्टमध्ये दिसली नाही.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button