पुढारी ऑनलाईन डेस्क : अलिबाबा दास्तान-ए-काबुल'मध्ये जोरावरची भूमिका साकारणाऱ्या मोहित अब्रोलला, जोरावरची भूमिका करण्यासाठी जवळपास २ महिने तयारी करावी लागली. मोहित आणि जोरावर हे दोघेही भिन्न असल्यामुळे तयारी करताना कटाक्षानं अभिनय करावा लागला. मोहित म्हणाला, 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल'ही अद्भुत मालिका आणि परिपूर्ण कौटुंबिक एंटरटेनर आहे. ही बालपणी आपण ऐकलेली प्राचीन कथा नाही. आमच्या मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट्स व रोमांच आहे. मालिकेमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांना टेलिव्हिजनवरील पहिली सिमसिम पाहायला मिळाली आहे, जिला स्वत:च्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. निर्माते 'खुल जा सिमसिम'या संवादापलीकडे गेले आहेत आणि हीच बाब या कथानकाला अत्यंत रोमांचक बनवते. मी मालिकेमध्ये जोरावरची नकारात्मक भूमिका साकारत आहे, जो प्रत्येक पावलावर अलीला हरवण्याचा प्रयत्न करतो. मालिकेमध्ये मी अलीचा शत्रू आहे. त्यांच्यामध्ये भांडण, संघर्ष आणि कधी-कधी धमालपूर्ण गंमतीजमती देखील होतात.
मोहित काही काळ टेलिव्हजनपासून दूर होता. याविषयी तो म्हणाला, 'माझी भूमिका जोरावरच्या बाबतीत मी पहिल्यांदा भूमिकेबाबत सविस्तरपणे ऐकले तेव्हा अधिक विचार केला नाही. जोरावरची भूमिका प्रबळ आहे आणि मला त्याच्यामध्ये असलेली क्षमता व त्याचे पद आवडते. जोरावर अत्यंत साधी भूमिका वाटत असेल. पण त्याच्यामध्ये अनेक पैलू सामावलेले आहेत. या भूमिकेमध्ये साकारण्यासारखे बरेच काही आहे. मी प्रेक्षकांना प्रबळ संदेश देणाऱ्या भूमिका साकारण्याचा नेहमीच आनंद घेतला आहे आणि मला मालिका 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल'चा भाग असण्याचा खूप आनंद होत आहे.'
जोरावर शाही सडकचा प्रमुख आहे. जोरावरचे वडील परवाझचे (अफगाणिस्तानमधील शहर) सरदार असल्यामुळे त्याचा स्वत:चा दर्जा आणि अभिमान आहे. तो अलीवर मात करण्याची कोणतीच संधी गमावत नाही. जोरावर श्रीमंत आहे. त्याला चांगले पोशाख घालायला आणि स्वत:ची श्रीमंती मिरवायला आवडते. तो स्वभावाने क्लासिस्ट आहे. शाही व मामुली गली यांच्यामध्ये तुलना करतो.
मोहित अनेक कॉस्चुम ड्रामा शोजचा भाग राहिला आहे. मालिका 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल' त्यांच्यापेक्षा किती वेगळी आहे. तो म्हणाला-मी तीन कॉस्चुम ड्रामा शोजमध्ये काम केले आहे, जे भारताच्या इतिहासावर अवलंबून होते. माझ्या मते ज्याप्रकारे मालिका 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल'ची निर्मिती करण्यात आली आहे. ते पाहता ही मालिका इतरांपेक्षा वरचढ आहे. निर्मात्यांनी मालिका सादर करताना बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष दिले आहे. मला मालिकेमधील आमचे कॉस्चुम्स आवडले आहेत. मला माझा कॉस्चुम खूप आवडला आहे, यामधून जोरावरचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे दिसून येते. कॉस्चुम्स, कथानकाचे सादरीकरण यासंदर्भात मालिका 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल' अत्यंत वेगळी आहे. या मालिकेमध्ये प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकासाठी काही-ना-काही आहे, जे टेलिव्हिजनवर यापूर्वी दिसण्यात आलेले नाही.
भूमिका करताना कोणती आव्हाने आली, याविषयी मोहित म्हणाला, तयारीच्या बाबतीत मी प्रामुख्याने उर्दू असलेले कथानक वाचण्यास सुरूवात केली. कारण मालिकेमध्ये अधिककरून उर्दू भाषा आहे. मला माझे लेहझा व भाषाशैली योग्य करण्यासाठी सराव करावा लागला. मला जोरावरची बोलण्याची व चालण्याची पद्धत आत्मसात करावी लागली. मला जोरावरची वृत्ती योग्यरित्या सादर करण्याचा प्रयत्न करावा लागला. त्याचे वडील सुप्रसिद्ध असल्यामुळे तो स्वत:ला सर्वांचा मालक समजतो. मला सम्राट सारखे वागावे लागले. मला घोडेस्वारी अगोदरपासून माहित आहे, ज्यामुळे याबाबत कोणतीच आव्हाने जाणवली नाहीत. मी माझ्या सह-कलाकारांसोबत केमिस्ट्री जुळवून घेण्यासाठी काही वर्कशॉप्स केले. जोरावर व मोहित हे दोघेही भिन्न असल्यामुळे मला भूमिकेसाठी जवळपास २ महिने तयारी करावी लागली.
"मी जवळपास ३ महिन्यांपासून शूटिंग करत आहे आणि यादरम्यान मला अली (शेहजान खान), त्याच्या मित्रांची टोळी व माझ्या मित्रांसोबत काम करायला मिळाले. त्यांच्यासोबत शूटिंग करताना खूप धमाल येते. आम्ही खूप धमाल करतो आणि ते उत्तम कलाकार आहेत."