पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील स्वामी चिन्मयानंदजी यांच्या महासत्संगात २ आणि ३ ऑक्टोबर २०१४ रोजी नेमंक काय घडलं होतं? या प्रश्नाच उत्तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम' चित्रपट अधुरं राहिलं होतं. यामुळे चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर देण्यास आणि अनेक घडामोंडीचा उलगडा करण्यास अजयने त्याचा आगामी 'दृश्यम २' ( Drishyam २ ) चित्रपट घेवून येत आहे. याआधी चित्रपटातील पहिला लूक अजय देवगनने सोशल मीडियावर शेअर केला होता. सध्या या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी 'दृश्यम २'( Drishyam २ ) चित्रपटातील टिझरमध्ये पहिल्यांदा एक मुलगा छत्री घेवून पावसात उभारलेला दिसतोय. याच दरम्यान चौकशी करत असलेल्या एकाची हत्या केली जाते. या घटनेची तपास पोलिस करताना विजय सागांवकरच्या कुटूंबियाची चौकशी सुरू होते. शेवटी घटनेचा तपास कोठपर्यत पोहोचतो हे आगामी चित्रपटात समजणार आहे.
या चित्रपटात अजयने विजय सागांवकरची भूमिका साकारली आहे. यात समीर देशमुखचा मुलगा ३ महिन्यापासून गायब असतो, त्याच्या सोशात पोलिसांची टिम लागलेली असते असे दाखवण्यात आलं आहे. तर विडयचा मुलगीला एक जण ब्लॅकमेल करत असतो आणि तिच्याकडून त्याचा खून होतो. परंतु, या घटनेतून विजय आपल्या मुलीला वाचवण्याचा सतत प्रयत्न करत असल्याचेही दाखवण्यात आलं आहे. यामुळे चित्रपटातील कथानक रंजक असल्याने चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
हा चित्रपट १८ नोव्हेंबरला रिलीज होणार होणार आहे. यात अजय देवगणसोबत बॉलिवूड अबिनेत्री श्रेया सरन, मृणाल जाधव, इशिता, तब्बू आणि रजत कपूर यांनी भूमिका साकारल्या आहेत. अजयने चित्रपटातील लूक शेअर करत 'दृश्यम २' चित्रपटाचा टीझर २९ सप्टेंबरला येणार असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा :