Asha Parekh : दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार | पुढारी

Asha Parekh : दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.  (Asha Parekh) अनेक हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या सुंदर अभिनेत्री आशा पारेख यांनी एकवेळ सिनेसृष्टी गाजवली होती. (Asha Parekh) दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण ३० सप्टेंबरला होणार आहे.

यासंबंधी मंगळवारी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी माहिती दिली. आशा पारेख अभिनेत्री असण्यासोबतच निर्मात्या आणि दिग्दर्शिका देखील आहेत. याआधी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते.

आशा पारेख यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून बेबी आशा पारेख नावाने केली होती. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना स्टेजवर नृत्य करताना पाहिलं आणि वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी माँ (१९५२) हा चित्रपट केला. नंतर बाप बेटी (१९५४) या चित्रपटात काम केले. परंतु, हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही.

वयाच्या १६ व्या ‍वर्षी त्यांनी मुख्य नायिका म्हणून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण, अभिनेत्री अमीतासाठी त्यांना विजय भट्ट यांच्या गूँज उठी शहनाई (१९५९) चित्रपटासाठी नाकारण्यात आले. कारण, चित्रपट निर्मात्याने दावा केला होता की, आशा यांच्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री बनण्यासाठी क्षमता नव्हती. आठ दिवसानंतर निर्माते सुबोध मुखर्जी आणि लेखक-दिग्दर्शक नासिर हुसैन यांनी त्यांना शम्मी कपूर यांचा चित्रपट दिल देके देखो (१९५९) मध्ये अभिनेत्री म्हणून घेतलं. या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं.

Back to top button