नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचे स्टार कपल रिचा चड्ढा आणि अली फजल (Richa Chadha-Ali Fazal wedding) यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाला बॉलिवूड स्टार्सशिवाय देश-विदेशातील अर्थात हॉलिवूडचे अनेक दिग्गज हजेरी लावणार असल्याचे वृत्त आहे. या दोघांच्या लग्नाचे आमंत्रण हॉलिवूडला गेले आहे. 'व्हिक्टोरिया आणि अब्दुल अली' या चित्रपटातील अली फसल याची सहकलाकर प्रसिद्ध अभिनेत्री डेम ज्युडी डेंच यांच्यासह अभिनेता जेरार्ड बटलर हे हजेरी लावणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिले आहे.
अभिनेता अली फजल सध्या कंदाहार हा हॉलिवूड चित्रपट करत आहे. या चित्रपटात तो अभिनेता जेरार्ड बटलर याच्या सोबत दिसणार आहे. या दोघांमध्ये या चित्रपटाच्या निमित्ताने चांगली मैत्री झाली असून अली फजलच्या लग्नाच्या निमित्ताने जेरार्ड बटलर भारतात येणार आहे. याच सोबत अलीने हॉलिवूडमधील महत्त्वाच्या लोकांनाही आमंत्रित केले आहे. 'तेहरान' या स्पाय थ्रिलर मालिकेतील कलाकारांचाही पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. लवकर नवदाम्पत्य लग्नाच्या सेलिब्रशनला सुरु करण्यासाठी दिल्ली रवाना होणार आहेत. (Richa Chadha-Ali Fazal wedding)
मुंबईच्या रिसेप्शनसाठी आमंत्रितांमध्ये अली फजलचा सहकलाकार आणि हॉलिवूडमधील मित्रांचा समावेश असल्याची चर्चा आहे. आतापासून काही दिवसांतच दिल्लीत लग्नसोहळ्याचे कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे आणि शेवटी 4 ऑक्टोबरला मुंबईत त्याची सांगता होणार आहे. याआधी रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची पत्रिका खूप चर्चेत होती. दोघांनी एका माचिसच्या पेटीवर लग्नाची पत्रिका बनवली होती. ही थीम खरोखरच वेगळी होती आणि ती चाहत्यांना देखील खूप आवडली होती. (Richa Chadha-Ali Fazal wedding)
अधिक वाचा :