
पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानने 'पठान' चित्रपटातील आपला एक फोटो शेअर केला आहे. (Pathaan Look) यामध्ये तो ८ पॅक एब्समध्ये स्टनिंग दिसतोय. शाहरुखच्या या फोटोवर फॅन्स खूप कमेंट्स करत आहेत. (Pathaan Look)
शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर अधिक पोस्ट शेअर करत आहे. त्या पोस्टदेखील आगामी प्रोजेक्ट्सविषयी असतात. फॅन्सदेखील त्याचा चित्रपट पाहण्यासाठी अत्सुक आहेत. शाहरुखने आपला चित्रपट 'पठाण'मधून एक शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याचे आठ पॅक एब्स दिसत आहेत. लांब केसांची स्टाईल, या लूकमधून त्याने उत्तम पोझ दिलीय.
हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना शाहरुख (Shahrukh Khan) ने आपल्या शर्टविषयी एक मेसेज लिहिलाय, 'मी टू माय शर्ट आज 'तू असतास तर कसं असतं…. तू या गोष्टीवर चिंतेत असतास…तू या गोष्टीवर किती हसला असतास… तू असतास तर असं असतं…मीदेखील पठाणची प्रतीक्षा करत आहे.'
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'मध्ये दीपिका पादुकोण-जॉन अब्राहमदेखील आहे.
'पठाण' शाहरुख खानच्या आगामी तीन चित्रपटांपैकी हा एक सिनेमा आहे. या चित्रपटाचे शूटिंग भारत, स्पेन आणि अनेक ठिकाणी शूट करण्यात आलं आहे. 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' यासारख्या चित्रपटांनंतर शाहरुख-दीपिकाची हिट जोडी पुन्हा एकदा परत येत आहे. पठाण पुढील वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.