पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते देव आनंद (Dev Anand Birth Anniversary) यांची आज जन्म आहे. देव आनंद यंचा हसरा अभिनय आणि निरागसपणा पाहून सगळेच भारावून जायचे. त्यांना पाहून तरुणी वेड्या झाल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांची एक झलक मिळवण्यासाठी त्या आतुर होत्या. आज त्यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, ज्यामध्ये हेमा मालिनी देखील आहेत. (Dev Anand Birth Anniversary)
देव आनंद आणि हेमामालिनी यांनी 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले, ज्यामुळे हेमा खूपच घाबरल्या होत्या. असे झाले की, एका दृश्यात हेमा मालिनी यांना केबल कारमध्ये बसावे लागले आणि देव आनंद हेमा यांच्या मागे येतो. 'ओ मेरे राजा' या गाण्यातील हा सीन होता.
या सीनच्या शूटिंगदरम्यान हेमा मालिनी आणि देव आनंद यांची केबल कार पर्वतांच्या मधोमध हवेत थांबली. हे पाहून अभिनेत्री हेमा मालिनी खूप घाबरल्या. हेमा घाबरलेली पाहून अभिनेत्याने तिला शांत केले. यानंतर देव आनंद यांनी त्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी त्यांची चेष्टा-मस्करी केली. त्यानंतर टीमने त्यांला तत्काळ खाली आणले. मात्र, हे प्रँक एका चाहत्याने केल्याचे नंतर उघड झाले.
हेमा मालिनी यांनी त्यांच्या 'बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. जॉनी मेरा नाम हा १९७० चा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट होता आणि १९७० मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट होता. देव आनंद यांनी 'टॅक्सी ड्रायव्हर', 'मुनीम जी', 'सीआयडी', 'नौ दो इलेवन', 'काला पानी', 'काला बाजार', 'जब प्यार किसी से होता' यासह अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच 'हम दोनों', 'असली नकली' और 'तेरे घर के सामने' 'गाईड', 'पेइंग गेस्ट', 'बाजी', 'ज्वैल थीफ', 'सीआइडी', 'वारंट', 'हरे रामा हरे कृष्णा', 'देस परदेस', 'अमीर गरीब' यासारक्या चित्रपटांचाही समावेश आहे.
हेही वाचा :