जेलमधून बाहेर आल्यानंतर KRK ने सोडलं 'हे' काम, म्हणाला.. | पुढारी

जेलमधून बाहेर आल्यानंतर KRK ने सोडलं 'हे' काम, म्हणाला..

पुढारी ऑनलाईन : चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके (KRK) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तो प्रत्येक नवीन बॉलीवूड चित्रपटाचे समीक्षा करत होता. ते काही लोकांना आवडते तर काही लोकांना ते आवडत नाही. यावरून लोकांनी अनेकवेळा केआरकेला ट्रोल केले आहे. इतकच नाही तर चित्रपटांच्या कलेक्शनबद्दलही तो अंदाज बांधतो. पण, आता केआरकेने चित्रपटांचे रिव्ह्यू न देण्याचे ठरवले आहे. त्याने एक ट्विट केले आहे, त्यामध्ये केआरकेने सांगितले आहे की, माझा ‘विक्रम वेधा’ हा शेवटचा चित्रपट असेल, ज्याची तो समीक्षा करणार आहे.

केआरकेने नुकतेच एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने यापुढे चित्रपटांची समीक्षा करणार नसल्याचे सांगितले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘समिक्षा करणे मी सोडतो आहे, विक्रम वेधा हा शेवटचा चित्रपट असेल ज्याची मी समीक्षा करणार आहे. माझ्या समीक्षांवर विश्वास ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. मला समीक्षक म्हणून न स्वीकारल्याबद्दल आणि माझ्या समीक्षांवर टीका केल्याबद्दल आणि माझ्यावर अनेक केस केल्याबद्दल बॉलीवूडमधील सर्व लोकांचे आभार. या ट्विटसोबत केआरकेने हार्ट इमोजीही टाकला आहे.

केआरकेच्या या ट्विटवर यूजर्संनी प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या या निर्णयावर अनेकजण खूश आहेत. तर काही लोकांनी हा निर्णय आवडला नसल्याचे प्रतिक्रियेतून सांगितले आहे. पोस्टच्या कमेंटमध्ये यूजरने लिहिले की, ‘असे करू नका’, त्याचप्रमाणे इतर लोकांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हेही वाचा;

Back to top button