Ananya Panday : ‘लायगर’च्या अपयशाचे खापर अनन्यावर | पुढारी

Ananya Panday : ‘लायगर’च्या अपयशाचे खापर अनन्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडे (Ananya Panday) आणि विजय देवरकोंडा यांचा बहुचर्चित ‘लाईगर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता; मात्र चित्रपट काही खास करू शकला नाही. ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशामुळे अनन्यालाही मोठा फटका बसताना दिसत आहे. ‘लाईगर’च्या अपयशाचे खापर आता अनन्यावर फोडले जात आहे.

अनन्या पांडे वाढवणार होती फी

‘लायगर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनन्या पांडे तिच्या फीमध्ये मोठी वाढ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर ‘लायगर’ काही खास कमाई करून न शकल्याने ज्या चित्रपटांच्या ऑफर्स अनन्याला आल्या होत्या. ते निर्माते आता वेगळ्या चेहर्‍याच्या शोधात आहेत. अनन्या पांडे चित्रपटात काही खास कामगिरी करू न शकल्याने ‘लायगर’ चित्रपट फ्लॉप झाल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केला जातोय. ट्रेलरपासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रीलिज झाल्यानंतर नेमके काय घडले, हे कळण्याच्या अगोदरच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल गेला.

अनन्याला साऊथ चित्रपटाच्या आलेल्या ऑफर झाल्या बंद (Ananya Panday)

‘लायगर’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आता अनन्याला साऊथ चित्रपटाच्या कोणतीही ऑफर्स आलेली नाही. चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या बातमीनुसार चित्रपट निर्माता अनन्याच्या अभिनयावर नाखुश आहेत. त्यामुळेच तिला साऊथच्या कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. याउलट अनन्याला यापूर्वी ऑफर आलेल्या चित्रपटांनाही इतर अभिनेत्रींशी संपर्क साधला जात आहे. जर हे वृत्त खरे असेल तर अभिनेत्री अनन्या पांडेला पुन्हा एकदा साऊथ सिनेमाजगतात पाऊल ठेवणं नक्कीच कठीण मानलं जात आहे.

चित्रपटाला सोशल मीडिया युजर्सबरोबर समीक्षकांनी वाईट प्रतिक्रिया

अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा लायगर हा चित्रपट रिलीज होताच फ्लॉप झाला आहे. या चित्रपटातील अनन्या पांडेचा अभिनयही खूपच निराशाजनक असून, तिने पुन्हा एकदा अभिनयाचे धडे घ्यावेत, असे वाटते. रोनित रॉयचे काम दमदार दिसत असले तरी विजयने चित्रपटात उत्तम काम केले आहे.

या चित्रपटाला सोशल मीडिया युजर्सबरोबर समीक्षकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असणाऱ्या केआरकेनेही (KRK) या चित्रपटाबद्दल ट्विट करून पाहण्यासाठी खर्च केलेले पैसे परत मागितले आहेत.

Back to top button