
अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. अलीकडच्या काळात तिचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे. दोघे डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा रेस्टॉरंटमधील एक फोटो व्हायरल झाला होता. आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.
8 सप्टेंबरला शुभमनचा वाढदिवस झाला. त्यावेळी सोशल मीडियातून त्याला शुभेच्छा देताना एका मित्राने एक पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते की, भगवान तुम्हें खूब सफलता दे, गुगल का ज्ञान दे और सभी से तुम्हें बहुत डअठअ प्यार मिले. शुभमन आणि सारा यांनी डेटिंगच्या चर्चा उडवून लावल्या असल्या तरी या पोस्टमध्ये साराचे नाव असल्याने शुभमन आणि सारामध्ये काहीतरी सुरू आहे, याची खात्री नेटकर्यांना पटली आहे.