Ranveer Nude Photoshoot: रणवीर म्हणतो, “त्यावेळी मी अंडरवेअर घातली होती”
पुढारी ऑनलाईन डेस्क : रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट केल्यानंतर त्याच्या अडचणी काय कमी होत नाहीत. कॅमेरासमोर न्यूट पोज देऊन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरुन (Ranveer Nude Photoshoot) ताे प्रचंड ट्रोलही झाला. पेपर मॅगझीनसाठी त्याने हा फोटोशूट केला होता. (Ranveer Nude Photoshoot)
रणवीर सिंहने न्यूड फोटोशूटची गंभीर दखल घेण्यात आली. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याने नग्न फोटोशूटद्वारे मोठ्या प्रमाणात महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करून त्याच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था चालविणार्या वेदिका चौबे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली हाेती.
या प्रकरणी रणबीरने पोलिसांना सांगितले की, सोशल मीडियावरील त्याचे फोटो "मॉर्फ" आणि "एडिट" केली गेली आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केलेली सात फोटो होते. २९ ऑगस्ट रोजी रणवीरचा जबाब नोंदवण्यात आला होता.
रणबीर याने पाेलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली सात छायाचित्रे अश्लील नव्हती. मी अंडरवेअर घातले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. तो फोटोशूटचा भाग नव्हता. याबाबत पोलिस अधिकारी म्हणाले, "रणवीरने आम्हाला फोटोशूट दरम्यान घेण्यात आलेले सर्व फोटो सोपवले आहेत. पोलिसांच्या टीमने रणवीरच्या इन्स्टाग्राम पोस्टचादेखील तपास केला. पण, त्यामध्ये असे काही फोटो नव्हते, जे तक्रारदाराकडून देण्यात देण्यात आले होते."
रिपोर्टनुसार, रणवीर सिंहला कदाचित या प्रकरणात क्लीनचिट मिळण्याची शक्यता आहे. कारण हे फोटो आता फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत.
हेही वाचा :