Tejaswi Prakash : ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील तेजस्वीचा फर्स्ट लूक रिलीज

tejaswi prakash
tejaswi prakash
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या कामाबद्दल  किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेते. (Tejaswi Prakash) तेजस्वी सौंदर्याबराेबरच अभिनयासाठीही प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मराठी रुपेरी पडदयावर आपला जलवा दाखवणार आहे. नुकताच आगामी 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील तिचा 'फर्स्ट लूक' रिलीज झाला आहे.  'श्रुती' असं तिच्या चित्रपटातील भूमिकेतील तिचे नाव आहे. (Tejaswi Prakash)

या व्हिडिओमधील तिचा चुलबुला आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या चित्रपटात तेजस्वी सोबत अभिनेता अभिनय बेर्डे झळकणार आहे. या दोघांची 'लव्हेबल केमिस्ट्री' आपल्या चाहत्यांची मने जिंकायला सज्ज झाली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे.

इमेन्स डायमेन्शन एंटरटेन्मेंट आर्टस प्रोड्क्शन, वेंकट अत्तीली आणि मृत्युंजय किचंबरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निशिता केणी आणि करण कोंडे यांच्या ड्रगन वॉटर फिल्म्सने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news