पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नो एंट्री' चित्रपट चांगला चालला होता. आता या चित्रपटचा सीक्वेल आणण्याची तयारी दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी केली आहे. या सीक्वेलच्या शूटिंगला जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अनिल कपूर, फरदीन आणि सलमान हीच स्टारकास्ट यात दिसणार आहे. जिथे पहिल्या भागाचा शेवट झाला होता तिथूनच दुसर्या भागाची सुरुवात होईल. काहीतरी वेगळे करायचे होते, त्यामुळे या सीक्वेलला उशीर झाला. सलमानला पटकथा आवडली आहे. फरदीनही उत्सुक आहे. अनिलने अद्याप पटकथा वाचलेली नाही. पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, 'नो एंट्री मे एंट्री' असे या सीक्वेलचे नाव असणार आहे.