पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बेबी डॉल' फेम अभिनेत्री सनी लिओनीने ( Sunny Leone ) बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांतील अभिनयाव्यतिरिक्त सनी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते. सध्या सनी लिओनी तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मालदीवच्या बीचवरील सनीच्या बिकिनीनं चाहत्यांना घायांळ केलं आहे.
'एक पहेली लीला' आणि 'जिस्म २' सारख्या चित्रपटांतून सनी लिओनीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविली. सनीचे सोशल मीडियावर ५३.६ मिलियन फॅन फॉलोव्हर्स आहेत. सनीच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोवर चाहत्यांनी नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. याच दरम्यान सनी (Sunny Leone) सध्या बिझी शेड्यूलमधून वेळात – वेळ काढून मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यास पोहोचली आहे. यावेळी ती मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात आली आहे.
सनीने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील ब्ल्यू रंगाच्या बिकिनीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत सनीच्या मागे निखल, निळ्या रंगाचा समुद्र दिसतोय. तर तिच्या आजूबाजूला दोन्हीकडे हिरवी गार झाडे- झुडपे दिसत आहेत. यातील खास म्हणजे, सनीच्या डोळ्यावर चष्मा असून तिच्या पायाखाली पांढऱ्या रंगाची वाळू दिसतेय. मोकळे केस, लिपस्टिक, चष्मा आणि ब्ल्यू बिकीनी यांनी तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.
फोटोला पोझ देताना सनीने कधी तिच्या कमरेवर हात तर कधी केसांवर हात ठेवल्याचे दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Day 1 Maldives'. असे लिहिले आहे. यावरून सनीने एक दिवसांची मालदीव ट्रिप प्लॅन केल्याचे समजते. ब्लू बिकिनीतील फोटो शेअर करून सनीने कर्वी फिगर दाखविली आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी 'Damn it's hot???', 'Wow ?', 'Koi hai?❤️', 'Gorgeous ?', 'Awsmm ❤️❤️', 'You looks so hot..??', 'Good looking ❤️❤️❤️', 'Uuuuuuuuffffffff', 'Stunning ?', 'Kitni hot h?', 'Cuteness?', 'Nice looking', Oh nice ❤️', 'You are tooo hottt and gorgeous ??❤️❤️'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.
यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्ट सेंक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. सनी नवनवीन तिचे हॉट- ग्लॅमरस फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. तर सनीचा आगामी 'ओह! माय घोस्ट' (Oh! My Ghost) चित्रपट १५ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे तिच्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे.
हेही वाचलंत का?