Girija Prabhu : कुणी तरी येणार येणार गं ? गौरीचं प्रेग्नेंसी फोटोशूट

gauri-jaydeep
gauri-jaydeep
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शिर्के-पाटलांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. (Girija Prabhu) शिर्के पाटलांची सून गौरी (गिरीजा प्रभू) प्रेग्नेंट आहे. तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा सोहळादेखील शिर्के पाटलांच्या घरात रंगणार आहे. तत्पूर्वी गौरी आणि तिचा पती जयदीप यांनी फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट गिरीजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Girija Prabhu)

गौरीने गुलाल रंगाची साडी त्यावर फुलांचे दागिने घातले आहेत. तर जयदीपने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघांनीही सुंदर फोटोशूट केला आहे. फोटोमद्ये दोघेही आनंदी दिसताहेत.

गिरीजा विषयी माहिती आहे का?

गिरीजाला बालपणापासून डान्सची आवड आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासून ती अनक डान्स स्पर्धेत सहभागी झालीय. तिला अभिनयाचीही आवड आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेपूर्वी तिने जय मल्हार, क्राईम डायरी, लक्ष्य, अंजली, विठू माऊली यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकचं नाही तर ती टीव्ही आणि चित्रपटातही झ‍ळकलीय. महाराष्ट्राचा डान्सिंग सुपस्टार, डान्स इंडिया डान्स, युवा डान्सिंग क्वीन या रिॲलिट शोमध्ये गिरीजा सहभागी झाली होती. पण, खरी ओळख मिळाली ती गौरी या पात्रामुळे. सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेतील तिची गौरी ही भूमिका लक्षवेधी ठरलीय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news