पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल रूही सिंह (Ruhi Singh) हिची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वाधिक सर्च होणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. तिची चर्चा होण्याचं कारण म्हणजे-रुहीचे हॉट फोटोज. एकामागून एक अपलोड करणाऱ्या फोटोंमध्ये रुहीचे सर्वाधिक फोटो हे स्विमिंग पूलमधील आहेत. आतादेखील तिने स्विमिंग पूलमध्ये नवे हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. बोल्ड पोजेस दिल्याने फोटो पाहणाऱ्यांचे डोळे चांगलेच विस्फारले आहेत. तिचा जबरदस्त फिटनेस तिच्या या फोटोतून दिसत आहे. (Ruhi Singh)
रूही सिंहचा जन्म १६ ऑक्टोबर, १९९१ रोजी राजस्थानात झाला. सुरुवातीचे शिक्षण जयपूरमध्ये घेतल्यानंतर ती मुंबई विद्यापीठात शिकण्यासाठी आली. रूही सिंहने खूप कमी वेळेत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे.
रूहीने मधुर भंडारकर यांच्या कॅलेंडर गर्ल्स या हिंदी चित्रपटातून एन्ट्री केली होती. आज तिचा सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे. जे तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी तिला फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर तिचे २.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. बिकिनी लूक असो वा सिंपल लूक, रूही कोणत्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसते. त्या त्या लूकमध्ये ती पोझ देताना पुढे मागे पाहत नाही.
रुही सिंग कॅलेंडर गर्ल्स आणि इश्क फॉरएव्हर या चित्रपटांमध्ये दिसली होती. हे चित्रपट फारसे हिट झाले नाहीत. पण त्यात रुही सिंहने आपली वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर रुहीचे फॅन फॉलोईंग वाढतच गेले.
फेमिना मिस इंडियामध्ये फर्स्ट रनरअप झाल्यानंतर तिने मिस मॉडल ऑफ वर्ल्डचा किताब आपल्या नावे केला.
रुहीची वार्षिक संपत्ती १.५ दशलक्ष डॉलर्स आहे. रुही अनेक जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. रुहीचे इन्स्टाग्रामवर खूप चाहते आहेत. रूही पाश्चात्य ते पारंपरिक पोशाखांमध्ये खूप सुंदर दिसते आणि तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरील अनेक पोस्टमध्ये ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसते.
रुहीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यादरम्यान तिने अनेक मॉडेल फोटोशूट केले आहेत. या मॉडेलिंगचे फोटो उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये रुही सिंहचा बोल्ड अवतार पाहायला मिळतो. रुहीने अल्पावधीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केले आहे.