पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'नवा गडी नवे राज्य' ( Nava Gadi Nava Rajya ) मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. या मलिकेतील सर्वच पात्रापैकी आ्रनंदी भूमिका खूपच गाजत आहे. या मलिकेतील आनंदीचे भूमिका मराठी अभिनेत्री पल्लवी पाटील हिने मनोरंजक रूपांत साकारली आहे. यात आनंदीचा पती राधव, सवत रमा, सासू सुलोचना आणि नंनद वर्षा यांची भूमिकाही चाहत्याच्या पसंतीस उतरली आहे. परंतु, या मालिकेत दिसणारी साधी भोळी आनंदी मात्र, खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस दिसतेय. यामुळे जाणून घेवूयात तिच्याविषयी…
'नवा गडी नवे राज्य' ( Nava Gadi Nava Rajya ) मालिका सध्या वेगळ्या वळणावर येवून ठेपली आहे. या मालिकेत पहिल्यांदा राघव आणि रमा यांचे लग्न झालेले असते. परंतु, एका मुलगीच्या जन्मानंतर काही कारणास्तावर रमाचे निधन होतं आणि राघवला दुसरे लग्न करावं लागते. याच दरम्यान राधवचं दुसरं लग्न एका खेड्यातील आनंदी नावाच्या मुलीशी होतं. परंतु, जेव्हा आनंदी लग्न होवून त्याच्या घरी येते तेव्हा कुटुंबियातील व्यक्तीशी जमवून घेणं आनंदीसाठी एक टास्क बनतो. मात्र, आनंदी या सगळ्यावर मात करत नव्या संसारात कसे आनंदी राहायचे? आणि सर्वांना कसे सुखी ठेवायचे? यात मग्न असते. पहिल्यांदा घरातील व्यक्ती तिच्याशी कामवाली बाईसारखा व्यवहार करत असतात. परंतु, आनंदी नेहमी सगळ्याच्या चांगला विचार करते. याच दरम्यान मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात.
याआधी राघव आनंदी आणि मुलगी चिंगीला घेवून लालबागच्या राजाला पाहण्यास जातात आणि तेथील गर्दीत आनंदी हरविते. सर्व शोधाशोध केल्यानंतर ती सापडते. तर सध्या मालिकेत आनंदी राघवच्या ऑफिसला जेवणाचा डब्बा घेवून जाते मात्र, राघव तिच्यावर रागावतो असे दाखवण्यात आले आहे. पहिल्यांदा राघव जेवणाचा डब्बा घरी विसरून जातो. यानंतर आनंदी सुलोचना आणि वर्षाला सांगून जेवणाचा डब्बा देण्यास राघवला देण्यास त्याच्या ऑफिसला जात असल्याचे सांगते. मात्र, दोघीजणी यावेळी पुन्हा हरविशील म्हणून तिला जाण्यास मज्जाव करत असते. याच दरम्यान सुलोचना वर्षाला तिला मोबाईल देण्यास सांगते. पण काय तरी कारण सांगून दोघीही मोबाईल देत नाहीत. दुसरीकडे राघवच्या आफिसमध्ये त्याने डब्बा आणला नाही म्हणून त्याचे सहकारी त्याला चिडवत असतात. तर यावेळी राघवला राग येत असतो. याच दरम्यान आनंदी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचते. आणि राघवला डब्बा देण्यास आल्याचे तेथील रिसेप्शनिस्टला सांगते. यानंतर ती राघवकडे आनंदीला घेवून जाते.
याच दरम्यान राघव आनंदीला ऑफिसमध्ये पाहताच आश्चर्यचकीत होतो आणि रागाने तिला तेथे कशाला आलीस, चोर- चौघात हसू करू घेवू का?, जा घरी असे म्हणत तिला बोहेर काढतो. यानंतर आनंदी रडत-रडत घरी येते. मात्र, रात्री उशिरापर्यत राघव घरी येत नाही. मध्यंतरी एक मोबाईल मात्र डिलिव्हरी बॉय आणून देतो. परंतु हा मोबाईल कोणासाठी आहे यावरून सुलोचना आणि वर्षा भांडण करतात. यानंतर रात्री उशीराने राघव घरी येतो. मात्र, त्यावेळी आनंदी मात्र, डिनर टेबलवरच वाट पाहत झोपी गेलेली असेत. या सगळ्यावरून राघव आनंदीची माफी मागेल काय?, शिवाय हा आलेला मोबाईल नेमका कोणासाठी आहे? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेने रंजक मोड घेतल्याचे दिसून येत आहे.
मालिकेतील साधी भोळी दिसणारी आनंदी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर नवनवीन मराठमोळी, पारंपारिक लूकमधील फोटो पहायला मिळतात. आनंदी म्हणजे, अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनयासोबत सोशल मीडियावरदेखील सक्रिय दिसतेय. पल्लवीचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धुळे येथे झाला आहे. पल्लवीने शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेज, अमळनेर येथून पूर्ण केलं आहे. त्यानंतर डी वाय पाटील महाविद्यालयातून आर्किटेक्टची पदवी मिळवली. 'क्लासमेट' या चित्रपटातून पल्लवीने पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या यशाने पल्लवीला सृष्टीत नवी ओळख मिळाली आहे.
हेही वाचलंत का?