sidharth shukla : शोकाकुल वातावरणात सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार | पुढारी

sidharth shukla : शोकाकुल वातावरणात सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ‘बिग बॉस १३’ चा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. यानंतर त्याच्यावर मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये ५ डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम केले.

यानंतर त्याचे पार्थिव एका रूग्णवाहिकेतून मुंबईत ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत आणले. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थच्या नातेवाईकांसोबत अनेक बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली होती.

ब्रम्हकुमारी रितीरिवाजामध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत यावेळी शोकाकूल वातावरण होते. याठिकाणी बिग बॉसमधील काही स्पर्धक, दिग्गज बॉलिवूड स्टार्ससोबत चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते.

या स्टार्संनी घेतले अंतिम दर्शन

बिग बॉस १३ ची स्पर्धक शेहनाज गिल, निकी तांबोळी, बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत, आसिम रियाज, अली गोनी, प्रिन्स नरुला आणि अभिनेता अर्जुन बिजलानी यासारख्या स्टार्संनी सिद्धार्थच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतले.

सिद्धार्थच्या पार्थिव रूग्णवाहिकेतून ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत आणले गेले. तेथे त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थची आई आणि दोन बहिणींसह कुंटूबिय आणि जवळचे नातेवाईकांनी हजेरी लावली.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधानाचा बिग बॉसची स्पर्धक आणि सिद्धार्थची मैत्रिण शहनाजला जबर धक्का बसला आहे. बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद केलेलं नाही. तसाच रिपोर्ट पोलिसांना दिला आहे. यामुळे सिद्धार्थचा मृत्यू नेमका कशाने झाला? याचा अजून उलगडा झालेला नाही. याशिवाय सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे निशाणही दिसलेले नाही.

सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा, यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button