
पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही. कृष्णम राजू ( Krishnam Raju ) यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. कृष्णम राजू 'रिबेल स्टार' या नावाने ओळखले जाते. त्याच्या कार्यकाळात त्यांनी १८३ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. ते बाहुबली फेम अभिनेता प्रभास याचे काका होत.
कृष्णम ( Krishnam Raju ) यांच्या प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. आज पहाटे पावणे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. बॉलिवूड, टॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातदेखील शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही कृष्णम यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. याबाबतची माहिती मिळताच अनेक स्टार्ससोबत केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कृष्णम राजू यांनी प्रभाससोबत 'रिबेल', 'राधे श्याम', 'बिल्ला द डॉन' आणि 'द रिटर्न ऑफ रिबेल २' चित्रपटात काम केले हाेते. ते राजकारणातही सक्रीय होते. १९९८ ते २००२ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कृष्णम राजू राज्यमंत्री होते. त्यांना तीन 'स्टेट नंदी अवॉर्ड' आणि साऊथ चित्रपटासाठी पाच 'फिल्मफेयर अवॉर्ड्स' मिळाले होते.
हेही वाचलंत का?