Sai Lokur : मंगळागौरीनंतर सई पतीसोबत स्विंमिग पुलात रोमॅंटिक मूडमध्ये

Sai Lokur : मंगळागौरीनंतर सई पतीसोबत स्विंमिग पुलात रोमॅंटिक मूडमध्ये
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी' फेम मराठी अभिनेत्री सई लोकुरने ( Sai Lokur ) गेल्या वर्षी तिर्थदीप रॉय याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सई पती तिर्थदीपसोबत मालदीवच्या बीचवर व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली. यानंतर अलिकडेच ती बालीमध्ये कुटूबांसोबत भटकंती करतानादेखील स्पॉट झाली. या दरम्यान तिने बालीतील भटकंती करताना पतीला मिस करत असल्याची पोस्ट शेअर केले होती. बालीहून परतल्यानंतर लगोच सईची पहिली मंगळागौर धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. तर सध्या या सर्वातून वेळात- वेळ काढून पुन्हा एकादा पतीसोबत स्विंमिग पुलात रोमॅंटिक अंदाजात दिसली आहे.

मराठी अभिनेत्री सई लोकुर ( Sai Lokur ) गेल्या काही दिवसांत तिच्या पतीला वगळून इतर कुटूंबियांसोबत बालीला पोहोचली होती. यावेळी तिने तेथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेत वेगवेगळे फोटोशूट केले होते. या व्हेकेशनमध्ये जंगलाची सफर करताना तिने वेगवेगळे प्राणी- पक्षी, दोरीचा उंच झोका, डोगर -दऱ्या, झाडे- झुडपे, पेनिडा बेट, उलुन दानु बेरातन मंदिर यासारख्या अनेक ठिकाणी भेटी देवून चाहत्याच्यासाठी फोटो पोस्ट केले होते. याच दरम्यान सईने तिच्या पती तिर्थदीप रॉय याला मिस करत असल्याचेदेखील म्हटलं होतं. यानंतर घरी आल्यानंतर लगेचच सईची पहिली मंगळागौरीचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानंतर सईला थोडी उंसत भेटल्याने ती पुन्हा एकदा पतीसोबत स्विमिंग पुलात मौजमस्ती करताना दिसली आहे.

अभिनेत्री सईने नुकतेच तिचा पती तिर्थदीप रॉयसोबत एका निसर्गरम्य ठिकाणी स्विमिंग पुलात रोमॅंटिक मूडमध्ये दिसली आहे. यावेळी सई गुलाबी रंगाच्या टूपीसमध्ये एकदम हटके दिसली. यातील विशेष म्हणजे, हे कपल रोमॅंटिक मूडमध्ये स्विमिंग पुलात किस करताना दिसले आहेत. याच दरम्यान शेअर झालेल्या एका व्हिडिओत पहिल्यांदा सई पाण्यामध्ये पाठमोरी उभी असल्याचे दिसते. यानंतर व्हिडिओ सुरू होताच ती स्वत: भोवती गोलगोल फिरत पाण्यात मौजमस्ती करताना दिसतेय. यासोबत तिच्या पाठिमागे सुंदर असा धबधबा आणि डोंगर दिसतोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'एक जिंदगी सौ ख्वाहिशें, मैं जिना, मैं जिना मे पुरी तरहा.' असे लिहिले असून हेच गाणे व्हिडिओच्या बॅकग्राऊडला वाजत आहे. हे फोटो चाहच्याच्या पंसतीस उतरले आहेत.

हा फोटो आणि व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Beautiful ❤❤??', 'Wow so beautiful, Superb, Nice', 'Angel rejoicing looking gorgeous in pink dress beautiful location, Looking so beautiful ?❤', 'So beautiful❤️', 'Beautiful nicely loved❤️', 'Hottty hotty', 'Puri mahol❤️', 'Absolutely Beautiful ?', 'Awesome' , 'Beautiful couple', 'So preety❤️', 'Nice shot photo ❤️', 'Stunning' .यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे् ईमोजी सेअर कतेले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास १० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. सई नेहमी वेगवेगळे व्हेकेशन, ट्रिफ, जंगलातीस सफर असे अनेक ठिकाणचे फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news