अल्लू अर्जुन हॉलीवूडला जाणार? | पुढारी

अल्लू अर्जुन हॉलीवूडला जाणार?

पुढारी ऑनलाईन : पुष्पा द राईज’ चित्रपटातून देशभरात धमाल उडवून देणारा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन आता हॉलीवूडच्या चित्रपटांत दिसण्यात शक्यता आहे.

अल्लूने हॉलीवूडच्या अनेक स्टुडिओजच्या निर्मात्यांची भेट घेतली आहे. न्यूयॉर्कमध्ये इंडिया डे परेड या कार्यक्रमावेळी या भेटी झाल्या होत्या. यातील काही निर्माते हे सुपर हीरो फ्रँचायजीचे आहेत. त्यामुळे जर सर्व काही सुरळीत झाले तर कदाचित अल्लू हॉलीवूडच्या एखाद्या सुपरहीरो चित्रपटात दिसू शकतो.

नुकतेच अभिनेता फरहान अख्तरने देखील मार्व्हल स्टुडिओजच्या ‘मिस मार्व्हल’मध्ये काम केले आहे. तसेच धनुषदेखील ‘द ग्रे मॅन’मध्ये दिसला होता. याशिवाय आलिया भट्टदेखील ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे. सध्या अल्लू ‘पुष्पा ः द रूल’या सिक्वेलच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रीलिज
होणार आहे.

Back to top button