
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमी आपले हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा सर्वत्र साजरा केला जात आहे. यात मराठी कलाकारही मागे राहिलेले नाहीत. अनेक कलाकारांसोबत मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुण्यातील पाच गणपतीचे दर्शन घेत हा उत्सव साजरा केला आहे. पुण्यातील या मानाच्या पाच गणपतीचे दर्शनाने चाहत्यांचे मन सुखावले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पुण्यातील पाच गणपतीचे दर्शन घेतल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत पुण्यातील पाच गणपतीसोबत प्राजक्ता आणि दोन लहान मुली दिसत आहेत. परंतु, लहान मुलींचे नाव अद्याप समजलेले नाही. यावेळीच्या काही फोटोत प्राजक्ताने गणपतीला हात जोडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. यासोबत झेंडूच्या फुलांची सजावट, नारळाचे तोरण, फळे, आरती यासोबत वेगवेगळे पाच गमपती दिसत आहे. यावेळी प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'सालाबादप्रमाणे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन ?. त्याचबरोबर यंदाचे वर्षी "हिंदूस्तानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची – भाऊसाहेब रंगारी गणेशाची" आरती करण्याचं पुण्य पदरात पडलं. (सोबतीला शेपूट होतचं ?). असे लिहिले आहे. तर यासोबत तिने #आराध्यदैवत #पुणं #हिंदू #मराठी #prajakttamali @♥️असे हॅसटॅगदेखील दिले आहेत. यावरून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्राजक्ताने पुण्यातील पाच गणपतीचे दर्शन घेवून दिर्घआयुष्यासाठी आशिर्वाद घेतलाय. तर पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपतीची आपती करण्याचा मान ही मिळाला असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतूस उतरले आहेत.
प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर हाताच चाहत्यांनी तिला गणेश चतुर्थीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यात काही चाहत्यांनी प्राजक्तासोबत दिसत असलेल्या मुलींना 'प्राजक्ताच्या सोबतीला शेपूट' आणि 'मधाळ मावशी आणि तिची लेक' असल्याचे म्हटले आहे. यासोबत प्राजक्ता सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर करून सतत सक्रिय असते.
हेही वाचलंत का?