प्रथमेश परब याच्या हाती मॅजिक बॉक्स, ६ चित्रपटांचा होणार धमाका | पुढारी

प्रथमेश परब याच्या हाती मॅजिक बॉक्स, ६ चित्रपटांचा होणार धमाका

मुंबई; पुढारी ऑनलाईन: कोराेना संसर्गामुळे गेले अनेक महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच, मराठी अभिनेता प्रथमेश परब यांच्या चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. एक-दोन नव्हे तर, प्रथमेश परब यांचे सलग ६ चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

प्रथमेश परबचे आगामी ६ चित्रपट येणार

प्रथमेशचे प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या ‘डार्लिंग’, ‘टकाटक २’, ‘लव सुलभ’, ‘ढिशक्यांव’, ‘टाइमपास ३’ या चित्रपटांच्या यादीत आता त्याचा ‘एक नंबर’ हा आणखी एक चित्रपट येत आहे.

सोशल मीडियावर नुकतेच ‘एक नंबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे या सर्वांद्वारे प्रथमेश मराठीच्या सिल्व्हर स्क्रीनवर चित्रपटाचा षटकार ठोकणार हे निश्चित आहे.

कोरोनाची दुसरी लाट शमविण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन २ मध्ये मॉल्स, चित्रपटगृह तसेच नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोविड परिस्थिती आटोक्यात आल्याने ही बंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे.

यामुळे प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठी चित्रपटाची नांदी पाहायला मिळणार आहे. ज्यात आपल्या लाडक्या ‘दगडू’ च्या एकामागून एक ६ चित्रपट रिलीज होणार आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button