सनी लियोनी एक्वा ब्लू बिकिनीत मालदीवच्या बीचवर अवतरली! | पुढारी

सनी लियोनी एक्वा ब्लू बिकिनीत मालदीवच्या बीचवर अवतरली!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पॉर्न स्टार बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) चित्रपटांत अधिक दिसून येत नसली तरी तिचे फॅन फॉलोइंग कोणत्याही फिल्मस्टारपेक्षा कमी नाहीत. सनी लियोनी सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या सौंदर्याचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या सनी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

सनीने मालदीवच्या बीचवरील आपले काही बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यात ती एक्वा ब्लू बिकिनीत दिसत आहे. बिकिनीत असलेल्या सनीच्या हातात वाइनची बाटली आहे. ही बाटली ती उघडताना दिसत आहे.

त्यासोबत सनीने (Sunny Leone) लिहिले आहे, ‘स्वर्गात तुमचे स्वागत. माझ्याशिवाय इथे कोणालाही परवानगी नाही. पार्टी करण्याची आणि जीवनाचा आनंद घेण्याची ही वेळ आहे!’.

सनी आणि तिचे कुटुंबिय हल्लीच मुंबईत आपल्या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. सनीने याची माहिती सोशल मीडियातून दिली होती. तिने नुकतेच ‘शीरो’ या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट मल्ल्याळम, तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

याशिवाय सनी भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंतच्या ‘पट्टा’मध्ये दिसणार आहे.

याआधी बिग बॉसच्या घरात सनीने एंट्री केली होती. सनीने यावेळी स्पर्धकांना असे काही करायला लावले यामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकवर्गही आवाक झाला. सनीने स्पर्धकांना दिलेला बोल्ड टास्क पाहून नेटकरी चांगलेच संतापले होते.

सनी लिओनीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये फार कमी काम केले आहे, परंतु ती एक अशी अभिनेत्री आहे की, तिचे प्रचंड चाहते आहेत. बिग बॉसच्या सीझन ५ मध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली होती. या शोमध्ये तिने आपली खास ओळख निर्माण केली होती. या शाेनंतर बॉलिवूडमधून तिला ऑफर्स आल्या.

हे ही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button