'चिकू की मम्मी दूर की' यासाठी परिधी शर्मा शिकली शास्त्रीय नृत्य! | पुढारी

'चिकू की मम्मी दूर की' यासाठी परिधी शर्मा शिकली शास्त्रीय नृत्य!

  • मुंबई; पुढारी ऑनलाईन: नुकतेच ‘चिकू की मम्मी दूर की’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये लिजेंड मिथून चक्रवर्ती यांच्या उपस्थितीमुळे चार चांद लागले आहेत. ‘चिकू की मम्मी दूर की’ मालिकेत आता चिकू आणि त्याची आई पुन्हा एकत्र कसे भेटतील यांचा अंदाज चाहते लावत आहेत. या मालिकेत ‘जोधा अकबर’ फेम परिधी शर्मा आईची भूमिका साकारण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे.

परिधी शर्मा हिचे या मालिकेसोबत वेगळे नाते आहे कारण ती एक रिअल लाईफमध्ये आई देखील आहे. चाहत्यांना तिचे हे रूप नक्कीच आवडेल असे तिने सांगितले आहे. या भूमिकेसाठी तिने जय्यत तयारी सुरू केली आहे. तिने सध्या शास्त्रीय नृत्य कला अवगत केली आहे.

 

शास्त्रीय नृत्य शिकणे माझ्यासाठी कठिण होतं

परिधी शर्माने या मालिकेत व्यक्तिरेखेच्या तयारीबद्दल सांगितले आहे की, ‘या भूमिकेसाठी शास्त्रीय नृत्य शिकणे माझ्यासाठी एक कठिण पाऊल होते!. विशेषतः मुद्रा. कारण त्यात तुम्ही चूक करूच शकत नाही. आणि यासाठी माझ्या बालपणातील मेंटरचे मी आभार मानते.

जी माझी तारणहार बनली आणि मला योग्य मुद्रांसह उत्कृष्ट शास्त्रीय नृत्य करण्याचा आत्मविश्वास दिला. तिच्या माझ्यावरील विश्वासाने मला माझ्या मुलीबरोबर शास्त्रीय नृत्याचा सराव करण्यास प्रोत्साहित केले. मी खरोखरच धन्य झाले आहे आणि आमच्या ‘चिकू की मम्मी दूर की’ या मालिकेबाबतच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आतुर आहे.’

परिधी शर्मासोबत वैष्णवी प्रजापती तिच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी ‘चिकू की मम्मी दूर की’ या मालिकेत कधीही न पाहिलेली संकल्पना पडद्यावर चाहत्यांना पाहावयास मिळणार आहे. यामुळे ही मालिका चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button