लक्ष्याची मुलगी स्वानंदी दिसतेय हॉट (फोटो व्हायरल) - पुढारी

लक्ष्याची मुलगी स्वानंदी दिसतेय हॉट (फोटो व्हायरल)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. स्वानंदी बेर्डे नेहमी आपले हटके फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चर्चेत असते. सध्या स्वानंदीचा हॉट लूक पाहायला मिळाला आहे.

स्वानंदी बेर्डे नुकतेच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. स्वानंदीचा पहिल्यांदा हॉट लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. या फोटोत स्वानंदी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

लडकी खूपच क्यूट आहे…

याशिवाय तिच्या हातात फुलांचा गुच्छ देखील आहे. या फोटोसोबत स्वांनदीने ‘लडकी खूपच क्यूट आहे’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने हॉट, आगदी क्यूट म्हणत हास्याचा ईमोजी शेअर केला आहे.

याआधी स्वानंदीने आपल्या वाढदिवस साजरा करताना इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यावर देखील चाहत्यांनी कॉमेंन्टस करत शुभेच्छा दिल्या होत्या. स्वानंदी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वळली आहे.

‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकातून भेटीस येत असल्याचे तिने स्वत: इंन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली होती. या नाटकात स्वानंदीने सौ. मानेंच्या भूमिका तर तिच्यासोबत अभिनेत्री प्रिया बेर्डेदेखील मुख्य भूमिकेत होत्या.

याशिवाय स्वानंदी नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असून आपले फोटो शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत तिने फुलांच्या बागेत हटके फोटोशूट केले होते. यानंतर ती चर्चेत आली.

हेही वाचलंत का? 

Back to top button