तू एवढी क्यूट कशी गं? तेजश्री प्रधान हिच्या ब्ल्यू ड्रेसमधील अदा - पुढारी

तू एवढी क्यूट कशी गं? तेजश्री प्रधान हिच्या ब्ल्यू ड्रेसमधील अदा

पुढारी ऑनलाईन : अग्गंबाई सासूबाई ही मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान ही अन्य कुठल्या मालिकेत दिसली नाही. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने या मालिकेत शुभ्रा या व्यक्तीरेखा साकारली होती.

तिने सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिने आपण पुन्हा सोशल मीडियावर कमबॅक करत असल्याचे म्हणत फोटो पोस्ट केली होती.

 

त्यानंतर ती सोशल मीडियावर सक्रिय दिसते. सातत्याने नवे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसाठी ती शेअर करत असते.

tejashree pradhan
तेजश्री प्रधान

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री हिने वेगवेगल्या मालिंकामधून यशाचे शिखर गाठले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत तिने मराठी इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या वेगळ्या अभिनयासाठी ती ओळखली जाते.

 

ब्ल्यू कलरच्या ड्रेसमधील फोटोंनी लावलं वेड

तिने सध्या तिचे ब्ल्यू कलरच्या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल आहेत. तिचे मनमोहक हास्य आणि सुंदर अदांनी चाहत्यांना क्लिनबोल्ड केले आहे.

व्हायरल झालेल्या तिच्या फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. ब्ल्यू कलरच्या वनपीस गाऊनमध्ये ती फारचं सुंदर दिसतेय. तिचं हास्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे.

तिने मराठी मालिकांसोबतच मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती मूळची डोंबिवलीची आहे.

‘या गोजिरवाण्या घरात’ ही तिची पहिली मालिका होती. पुढे तिने ‘लेक लाडकी या घरची’ मालिकेत काम केले. या मालिकेत तिची मुख्य भूमिका होती.

तसेच झी मराठी वरील ‘होणार सून मी या घरची’ ही तिची मालिका सुपरहिट ठरली. यामध्ये तिची जान्हवीची भूमिका होती. शशांक केतकर तिच्या पतीच्या भूमिकेत होता. त्याने श्री ही व्यकितीरेखा साकारली होती.

पुढे ती आणि शशांक रिअल लाईफ पार्टनर झाले. पण, त्यांची जोडी फार काळ टिकली नाही. शशांक आणि तेजश्री अखेर वेगळे झाले.

 

 

काही दिवसांपूर्वी तेजश्री नव्या मराठी मालिकेत दिसणार, असे वृत्त समोर आले होते. पण, तेजश्रीकडून याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचलं  का? 

 

Back to top button