संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सोनम कपूर? | पुढारी

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सोनम कपूर?

मुंबई; पुढारी ऑनलाईन: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्याच्यासोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक स्टार्सचे स्वप्न असते. याचदरम्यान बॉलिवूड स्टार्स सोनम कपूर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना काही दिवसांपूर्वी भेटायला गेली होती. यानंतर ती त्याच्या आगामी चित्रपटात काम करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या अफवांवर सध्या खंडण केले गेले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळींच्या कार्यालयाबाहेर स्पॉट झाले होते. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर देखील त्याच्या कार्यालयाबाहेर दिसली.

याबाबतची माहितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, सोनम कपूर आगामी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत चित्रपट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

चर्चांना पूर्णविराम मिळाला

यानंतर सध्या मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यात तिच्या येण्याचं आणि संजय लिला भन्साळी प्रॉडक्शन हाऊसशी काही संबंध नसल्याचे फिल्ममेकर्सनी खुलासा केला आहे. यावरून सोनम कपूर भन्साळींसोबत आगामी चित्रपटात काम करण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. यासोबत सोनम फक्त औपचारिकपणे इतर स्टार्सप्रमाणे भेटायला आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोनम कपूरने संजय लीला भन्साळीसोबत ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले होते. सोनम कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती आगामी ‘ब्लाइंड’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

सोनम बहिण रिया कपूरच्या लग्नात पेस्टल ग्रीन रंगाचा अनारकली ड्रेसमध्ये दिसली होती.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ती प्रेग्नेंट आहे काय? असा नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ  : अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

Back to top button