मन झालं बाजिंद : श्वेता खरात 'या' अभिनेत्याची आहे गर्लफ्रेंड? - पुढारी

मन झालं बाजिंद : श्वेता खरात 'या' अभिनेत्याची आहे गर्लफ्रेंड?

पुढारी ऑनलाईन : टीव्हीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत श्वेता खरात हिने मोनाची भूमिका साकारली होती. या मालिकेत संजीवनीच्या बेस्ट फ्रेण्डची अर्थात मोनाची भूमिका श्वेता खरात साकारत आहे.

या मालिकेतील संजीवनी म्हणजेच शिवानी सोनार होती. तिच्यासोबत तिची लाजरीबुजरी मैत्रीण म्हणून श्वेताला ओळख मिळाली. सध्या ती झी मरीठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.  पण, तुम्हाला माहिती आहे का, श्वेता ही अज्याची गर्लफ्रेंड आहे.

‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील अज्याची भूमिका नितीश चव्हाणने साकारली होती. तो सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. डान्सची आवड असल्यामुळे नितीश कायम आपले व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना खुश करतो. बऱ्याच व्हिडीओमध्ये एक तरुणी नितीशसोबत कपल डान्स करताना दिसते.

नितीशच्या बऱ्याच व्हिडीओमध्ये श्वेता कपल डान्स करताना दिसते. श्वेताने घेतला वसा टाकू नको मालिकेतील भगवान शंकराच्या पौराणिक कथेत महालक्ष्मीची भूमिका केली होती. श्वेता खरात सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर श्वेता राजन असं तिने हँडल नेम ठेवलं आहे.

श्वेताने साताऱ्यात असताना ऑडिशन्स दिले. ऑडिशनमधून राजा राणीची गं जोडी मालिकेसाठी तिची निवड झाली. नितीश आणि श्वेता या दोघांचे एकत्र डान्स व्हिडिओही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात. दरम्यान, नितीश आणि श्वेता यांचं अफेअर असल्याची चर्चा होती.

श्वेता-नितीश यांची जुनी ओळख

लागिरं झालं जी मालिकेचं शूटिंग साताऱ्यात होत होतं. या मालिकेत नितीश चव्हाण (अज्या), शिवानी बावकर (शितली) यांच्या भूमिका होत्या. असे अनेक स्थानिक कलाकार या मालिकेत होतं.

या मालिकेतून त्यांना अभिनय़ासाठीचं व्यासपीठ मिळालं होतं. नितीशप्रमाणेच श्वेता खरातही मूळ साताऱ्याचीच आहे.

नितीश आणि श्वेता हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. नितीश आणि श्वेता यांचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, दोघांकडूनही उत्तर आलं नाहीये.

झी मराठी वाहिनीवरील ‘लागीरं झालं जी’ ही मालिका संपली. त्यानंतर नितीश कोणत्या मालिकेत झळकला नाही. पण, सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतो.

तो चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. तर श्वेता खरात सध्या मन झालं बाजिंद या मालिकेत दिसतेय.

हेही वाचलं का ?

 

Back to top button