रॅम्पवॉकवेळी चूक झाली.. कृती सेनॉन ढसाढसा रडली - पुढारी

रॅम्पवॉकवेळी चूक झाली.. कृती सेनॉन ढसाढसा रडली

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन नुकतेच ‘मिमी’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. सध्या कृती सेनॉन हिने रॅम्पवॉकवेळी ढसाढसा रडल्याचा खुलासा केला आहे.

नुकतेच झालेल्या मुलाखतीत कृती सेनॉन याबाबतचा खुलासा केला आहे. यात तिने मॉडेलिंगच्या सुरुवातीला पहिल्या रॅम्प वॉकच्यावेळी कोरिओग्राफरने २० मॉडेल्ससमोर फटकारल्‍याचेही तिने सांगितले.

रॅम्पवॉकवेळी ढसाढसा रडली

याबाबत माहिती देताना कृती म्हणाली की, ‘जेव्हा मी माझ्‍या आयुष्यातील पहिला रॅम्पवॉक शो करत असताना थोडी गडबड केली आणि यानंतर मला पहिल्यांदा कोरिओग्राफने इतर २० मॉडेल समोर रागावले होते. या घटनेनंतर मात्र, माझे डोळे पाणावले होते.’

यापुढे जावून कृती म्हणाली की, ‘या घटनेनंतर मी घाईने एका रिक्षात बसले आणि तेथेही मला रडू कोसळले. याशिवाय मी माझ्या घरी जावून माझ्या आईजवळ जावून पुन्हा रडू लागले.’

आई धीर देत म्हणाली हाेती की, ‘हे करिअर तुझ्यासाठी आहे की नाही याची कल्पना मला नाही. तुला भावनिकदृष्ट्या मजबूत होण्याची गरज आहे. त्यासोबत आत्मविश्वास असणे देखील महत्त्वाचे आहे.’

कृती सेनॉन नेहमी आपल्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमी आपले हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

कृतीचा ‘मिमी’ हा चित्रपट नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. कृती आगामी अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ आणि टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यासोबत ती ‘भेडीया’ आणि ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटदेखील घेवून येत आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :  अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

Back to top button