नुसरत जहां यांच्या बाळाला यश दासगुप्ताने घेतले कुशीत | पुढारी

नुसरत जहां यांच्या बाळाला यश दासगुप्ताने घेतले कुशीत

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) यांनी गेल्या आठवड्यात कोलकाता येथील खासगी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. त्यानंतर नुसरत जहां (Nusrat Jahan) यांना सोमवारी दुपारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलधून डिस्चार्ज झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत नुसरत त्यांचा कथित बॉयफ्रेंड, बंगाली अभिनेते आणि सध्या राजकारणात सक्रिय असलेले यश दासगुप्ता यांच्यासोबत दिसून आली. तसेच आश्चर्यजनक बाब म्हणजे या व्हिडिओत यश हे बाळाला कुशीत घेऊन कारमध्ये बसलेले दिसतात. ज्यावेळी यश यांनी बाळाला घेऊन घरात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी मीडियाला आनंदाने हात वर करुन प्रतिक्रिया दिली.

नुसरत यांनी गेल्या बुधवारी मुलाला जन्म दिला होता. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बाळाच्या जन्मानंतर यश यांनी लगेच आपल्या चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे म्हटले होते.

नुसरत जहां याआधी अनेकवेळा चर्चेत आल्या होत्या. नुसरत यांनी उद्योजक निखिल जैन सोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. मात्र, नुसरत यांनी दावा केला होता की त्यांचे हे लग्न भारतात मान्य नाही. कारण त्यांनी लग्नाची नोंदणी केली नव्हती.

नुसरत यांनी २०१९ मध्ये उद्योजक निखिल यांच्याशी लग्न केले होते. पण, लग्नानंतर काही दिवसांनंतर दोघांच्यात तू तू मैं मैं झालं. मग, दोघे वेगवेगळे राहू लागले.

दोघे वेगळं झाल्यानंतर नुसरत यांच्या प्रेग्नेंसीची माहिती समोर आली होती.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Yishaan Jahan (@yishaan_fan_page)

Back to top button