Bigg Boss OTT : ग्लॅमरस निया शर्मा हिची वाईल्ड कार्ड एंट्री - पुढारी

Bigg Boss OTT : ग्लॅमरस निया शर्मा हिची वाईल्ड कार्ड एंट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉसमध्ये ग्लॅमर, ड्रामासाठी काही स्पर्धकांना वाईल्ड कार्ड एंट्री दिली जाते. निया शर्मा बिग बॉस ओटीटीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निया शर्मा हिची एंट्री शोमध्ये बुधवारी दाखवली जाईल.

टीव्ही आणि रिॲलिटी शोजमध्ये निया स्टायलिश अंदाजासाठी प्रसिध्द आहे. आता निया बिग बॉस ओटीटीमध्ये एंट्री घेणार आहे.

 

या वाईल्ड कार्ड एंट्री करून या शोमध्ये सहभागी होईल. नियाने या गोष्टीची पुष्टी केली. तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. या फोटोला तिने इंटरेस्टिंग कॅप्शन लिहिली आहेत.

 

सूत्रांच्या माहितीनुसार- बिग बॉसमध्ये निया बुधवारी एंट्री घेणार आहे. नियाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या शोमध्ये तिच्या एंट्रीआधी तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय.

 

या फोटोंमध्ये निया आराम करताना दिसत आहे. नियाने लिहिलंय – ‘चलो कुछ तूफ़ानी करते हैं… एक सितम्बर को बिग बॉस ओटीटी.’

याआधी नियाने आपले काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले होते. यामध्ये ती लाल रंगाच्या टू पीस ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये नियाने लिहिलंय- अघोरी.

नियाला बिग बॉसचे निर्माते खूप आधीपासून नियाला या शोमध्ये आणण्याचे प्लॅनिंग करत होते. आता निया या बिग बॉसमध्ये यायला सज्ज आहे.

निया २०२० मध्ये खतरों के खिलाडी शोचा विजेती ठरली होती. ती नागिन-४ मध्ये दिसली होती. या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. निया रिअल लाईफमध्येही सुंदर आहे.

बिग बॉस ओटीटी ८ ऑगस्टला वूट सिलेक्टवर सुरू झाला होता. पण, सहा आठवड्यानंतर हा शो कलर्स वाहिनीवर शिफ्ट करण्यात आला. बिग बॉस १५ म्हणून हा शो झाला.

बिग बॉस-१५ सलमान खान करणार होस्ट

बिग बॉस ओटीटीचे होस्ट करण जोहर करत आहे. तर बिग बॉस-१५ सलमान खान होस्ट करेल. या शोमध्ये या आठवड्यात जीशान खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याने नियमांचं उल्लंघन केलं होतं. जीशानने प्रतीक सेहजपालला धक्का दिला होता.

हेही वाचलं का? 

Back to top button