सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरी खऱ्या आयुष्यात आहे ऑलराऊंडर | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरी खऱ्या आयुष्यात आहे ऑलराऊंडर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून गिरीजा प्रभू चाहत्यांच्या घरांघरात पोहोचली. या मालिकेत गिरीजा प्रभू हिने गौरी हे पात्र साकारले आहे. सुरुवातीला या मालिकेत गिरीजाने एका घरकाम करणाऱ्या तरूणीची भूमिका साकारली होती. पुढे ती या घरची सून होते. गौरी दमदार अभिनयासोबतच खूप सुंदर आहे. खऱ्या आयुष्यात ती ऑलराऊंडर आहे. तुम्हाला तिच्याविषयी माहिती आहे का?

अधिक वाचा-

मुख्य भूमिका असलेली गिरीजाची ही पहिलीच मालिका आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत काम करत आहे. गिरीजा या मालिकेत शांत स्वभावाची आणि भोळीभाबळी दाखवण्यात आली आहे. तिच्या या स्वभावाने घरातील अनेकांची मने आणि विश्वास जिंकण्यास ती यशस्वी ठरलीय.

अधिक वाचा-

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप आणि गिरिजा यांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. ही जोडी चाहत्यांच्या खूपच पंसतीस उतरली आहे.

गिरीजा खऱ्या आयुष्यात ऑलराऊंडर आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे. तसेच ती प्रोफेशनल डान्सरसुद्धा आहे. झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.

याव्यतिरिक्त तिला चित्रकलेचीही आवड आहे. मंडाला आर्टचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गिरीजा योगादेखील करते. गिरीजा फिटनेसला प्रचंड महत्व देते.

ती हार्मोनियमदेखील वाजवते. सराव करतानाचे काही व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. गिरीजा प्रभू नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेदेखील वाचलंत का? – 

गिरीजा उत्तम खवय्यीसुद्धा आहे. नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्याची तिला खूप आवड आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या गिरीजाचा चाहता वर्ग मोठा आहे. गिरीजाच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
गिरीजाने ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यात ती उपविजेती ठरली होती.

गिरीजाने आपले साडीतील फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत गिरीजाचा मनमोहक मराठमोळा लूक दिसत आहे.
असेच मननोहक फोटो पुढे पाहा..

 

Back to top button