
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा खिलाडी आणि अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी 'कठपुतली' (Cuttputlli Trailer) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. याआधी चित्रपटाचा टीझर आणि चित्रपटातील फर्स्ट लुक चाहत्याच्या भेटीस आला होता.
'कठपुतली' या चित्रपटाची कथा कसौली शहराभोवती फिरणारी आहे. चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत असून जो सीरियल किलरच्या शोधात असल्याचे दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने मुख्य भूमिका साकारली आहे. (Cuttputlli Trailer)
कठपुतली चित्रपटाचे शूटिंग मसुरीत येथे पार पडले. हा चित्रपट 'रतससन' (Ratsasan) नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट सिनेमागृहाऐवजी थेट ओटीटीवर रिलीज होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रणजीत एम. तिवारी यांनी केले आहे. जवळपास दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अक्षयसोबत सरगुन मेहता, चंद्रचूर सिंग आणि गुरपीत घुग्गी यांच्यासह पोलिसांची एक टीम सीरियल किलरचा पाठलाग करताना दिसते.
कसौली या हिल स्टेशनमध्ये तीन शाळकरी मुलींची हत्या करण्यात आलेली असते. अक्षय आणि त्याच्या टीमकडे गुन्हेगाराला शोधण्यासाठी दोन दिवस असतात, अशी ही कहाणी आहे.
अक्षय कुमारने ट्रेलरला शेअर करत सोशल मीडियावर लिहिलं, '३ मर्डर, १ शहर, १ पोलिसवाला आणि १ सीरियल किलर. कठपुतली २ सप्टेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल'.
हेही वाचा :