nupur alankar : या प्रसिध्द टीव्ही अभिनेत्रीने घेतला संन्यास | पुढारी

nupur alankar : या प्रसिध्द टीव्ही अभिनेत्रीने घेतला संन्यास

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केलेली टीव्ही अभिनेत्री नुपूरने (nupur alankar) आता कलाविश्व सोडले आहे. जवळपास २७ वर्षे अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर ही अभिनेत्री ग्लॅमरस जगापासून वेगळी झाली आहे. तिने वस्त्रे परिधान करून, कपाळी चंदन लावून गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्याचे दिसत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पाहायला मिळत आहेत. (nupur alankar)

टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मी धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आणि गरजूंना मदत करण्यात मग्न होते. माझा नेहमीच अध्यात्मिककडे कल होता. मी नेहमीच याचे पालन केले आहे. त्यामुळे मी आता यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनसोबत काम करायला मिळाल्याबद्दल धन्यवाद. मी तिथे समिती सदस्य म्हणून काम केले.

नुपूरने पैशासाठी भाड्याने घर दिले

ही अभिनेत्री इंडस्ट्री तसेच मुंबई शहर सोडून हिमालयात गेलीय. “हे खरोखर एक मोठे आणि धाडसी पाऊल असल्याचे ती म्हणते. हिमालयात राहून माझा आध्यात्मिक प्रवास होणार आहे. माझ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी मुंबईतील घर भाड्याने दिले आहे, असेही तिने सांगितल्याचे वृत्त आहे. नुपूरच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या लूकमुळे आणि तिच्या संन्यासी होण्याच्या निर्णयावर आलेल्या प्रतिक्रियांमुळे खूश आहे. ती म्हणते, ‘मी भावनिकदृष्ट्या तुटलेली आहे, असे लोकांना का वाटते, हे मला कळत नाही. मला या मार्गावर जाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही.

नुपूर पुढे म्हणाली की, तिची बहीण जिज्ञासा ही एकमेव अशी व्यक्ती होती जिला तिच्या निर्णयाने अजिबात आश्चर्य वाटले नाही. नुपूर २००७ पासून योगाभ्यास करत आहे. त्यावेळी ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती. तिच्या आयुष्यात आता नाटक, अभिनय नाही, असेही ती म्हणते. डिसेंबर २०२० मध्ये माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला जाणवले की मला आता काहीही गमावण्याची भीती वाटत नाही. मला सर्व अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांपासून मुक्त वाटल्याचे तिने नमूद केले.

कायदेशीर नाही पण नुपूर पतीपासूनही विभक्त झाली

नुपूरने संसाराचाही त्याग केला आहे. ती पतीपासूनही विभक्त झालीय. तिने २००२ मध्ये अभिनेता अलंकार श्रीवास्तवसोबत लग्न केले होते. ती म्हणते की, मला त्याला विचारण्याची गरज नव्हती. मी कुठे जात आहे हे त्याला माहीत होते. मात्र, माझ्या निवृत्तीच्या इच्छेबद्दल मी त्याच्याशी एकदा बोललो. त्याने मला मुक्त केले आणि त्याच्या कुटुंबाने माझा निर्णय स्वीकारला आहे. जोपर्यंत माझे लग्न टिकले, तोपर्यंत चांगला संसार झाला. आम्ही एकत्र नाही किंवा आम्ही वेगळे होण्यासाठी कोणताही कायदेशीर मार्ग स्वीकारला नाही.

नुपूरने ‘शक्तिमान’, ‘घर की लक्ष्मी कन्या’, ‘तंत्र’ अशा टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘राजा जी’, ‘सावरियां’ आणि ‘सोनाली केबल’चा या चित्रपटांतही ती दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Alankaar (@nupuralankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Alankaar (@nupuralankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Alankaar (@nupuralankar)

Back to top button